ENG vs NZ World Cup 2019 Final मॅचआधी जोफ्रा आर्चर ने उघडकीस केले यशाचे रहस्य- बार्बाडोसच्या स्मशानभूमीत करायचा गोलंदाजीचा सराव
तरुण असताना आर्चरने दुसरे काहीच केले नाही तर आपले सावत्र वडील पॅट्रिक वेटे यांच्याबरोबर क्रिकेट खेळला. स्मशानभूमीच्या बाजूच्या खेळपट्टीवर आर्चर गोलंदाजीचा सराव करायचा.
यजमान इंग्लंड (England)आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकचा अंतिम सामना खेळाला जात आहे. दोन्ही संघात जो कोणी विजयी होईल तो पहिल्यांदा विश्वचषक जिंकण्याचा मान पटकावणार. इंग्लंड आणि न्यूझीलंड संघ सुरुवातीपासून विश्वचषकचा पसंदीदा संघ मानला जात होता. दोन्ही संघाने स्पर्धेची दमदार सुरुवात केली. इंग्लंडसाठी त्यांच्या फलंदाजांनी जितका मोलाचा वाटा निभावला तितकेच जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याने प्रत्येक सामन्यात महत्वाची भूमिका बजावली. ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध सेमीफायनल सामन्यात 5 विकेट घेत आर्चरने इंग्लंड संघाला 27 वर्षांनी फायनलमध्ये नेण्यास मदत केली. आता न्यूझीलंडविरुद्ध फायनल आधी आर्चरने आपल्या यशस्वी गोलंदाजीचे रहस्य उघडकीस केले आहेत. (ENG vs NZ World Cup Final सामन्यासाठी आयसीसीने लॉर्ड्स मैदानाला घोषित केले 'नो फ्लाइंग जोन')
आर्चर तर्फे आयसीसीने लिहिले, "मी खूप शांत व्यक्ती आहे. आपल्याला याची जाणीव असायला हवी. मी नेहमी याच प्रयत्नात असतो कि मी असाच रावो. मी गोंधळ नये म्हणून प्रयत्न करतो कारण त्यानंतर आपण ते करतो जे आपल्याला वाटले पाहिजे की आपण असे केले पाहिजे. आपण जितके अधिक शांत असाल तितके चांगले."
बार्बाडोस (Barbados), वेस्ट इंडिज (West Indies) मध्ये जन्मलेला आर्चरला अव्वल स्थान गाठण्यासाठी कठीण मार्गातून जावे लागले. ब्रिजटाउन (Bridge Town) च्या बाहेर अगदी विनम्रतेने वाढलेला आर्चर त्याच्या वेस्ट इंडीज क्रिकेटचे नायक कर्टनी वॉल्श (Courtney Walsh), कर्टली एम्ब्रोस (Curtley Ambrose) आणि मायकेल होल्डिंग (Michael Holding) यांच्या पावलावर पाऊल टाकत आपल्या देशासाठी देशासाठी खेळायचे होते. आणि 2014 मध्ये विंडीजच्या अंडर-19 पातळीवर त्याने तीन वेळा देशाचे प्रतिनिधित्व केले. पण 2014 च्या विश्वचषकसाठी वरिष्ठ खेळाडूच्या संघात त्याला दुर्लक्ष केले गेले तेव्हा त्याने त्याच्या वडिलांचे जन्मस्थान इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला.
तरुण असताना आर्चरने दुसरे काहीच केले नाही तर आपले सावत्र वडील पॅट्रिक वेटे (Patrick Waithe) यांच्याबरोबर क्रिकेट खेळला. बार्बाडोसमध्ये आर्चरपासून संध्याकाळपर्यंत क्रिकेट खेळायचा. स्मशानभूमीच्या बाजूच्या खेळपट्टीवर आर्चर गोलंदाजीचा सराव करायचा.