ENG vs WI 2020: वेस्ट इंडिजविरुद्ध अंतिम टेस्ट खेळू शकणार जोफ्रा आर्चर? जाणून घ्या त्याच्या कोरोना व्हायरस रिपोर्ट
पाच दिवस क्वारंटाइन कालावधीनंतर आर्चरची कोरोना टेस्ट करवण्यात आली ज्याचा निकाल नकारात्मक आल्यावर अखेर त्याला तिसरा टेस्ट खेळण्यासाठी क्लिअर केले गेले.
जैव-सुरक्षितता (Bio-Secure) प्रोटोकॉलचा भंग केल्यावर वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) मॅन्चेस्टर येथील दुसर्या कसोटी सामन्यातून बाहेर पडलेला जोफ्रा आर्चरला (Jofra Archer) मालिकेच्या अंतिम कसोटी सामन्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे. मालिकेचा तिसरा कसोटी सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) मैदानावरच खेळला जाणार आहे. तिसरा कसोटी सामना 24 जुलैपासून खेळला जाणार आहे. साऊथॅम्प्टन सोडल्यानंतर आर्चरला अनधिकृतपणे त्याच्या घरी भेट दिल्यानंतर त्याला साम्याच्या काही तासांपूर्वी संघातून वगळण्यात आले होते. पाच दिवस क्वारंटाइन कालावधीनंतर आर्चरची कोरोना टेस्ट करवण्यात आली ज्याचा निकाल नकारात्मक आल्यावर अखेर त्याला तिसरा टेस्ट खेळण्यासाठी क्लिअर केले गेले. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) बुधवारी ही माहिती दिली. इंग्लंडने दुसरा कसोटी सामना 113 धावांनी जिंकत मालिका 1-1 ने बरोबरी केली आणि आता शेवटचा सामना निर्णायक असेल. (ENG vs WI: Biosecurity नियम मोडल्या प्रकरणी जोफ्रा आर्चरला दंड, पण वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या टेस्ट सामन्यासाठी उपलब्ध)
इंग्लंडच्या पुरूष क्रिकेटचे व्यवस्थापकीय संचालक एशले जाइल्स म्हणाले की, हा भंग "आपत्ती ठरू शकतो" ज्यामुळे इंग्रजी क्रिकेटला "कोट्यवधी पौंड" खर्च करावा लागला. तथापि, जाइल्स यांच्या अध्यक्षतेखालील शिस्तभंगाच्या सुनावणीनंतर आर्चरला दंड व अधिकृत लेखी इशारा देण्यात आला. अरिचरला एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड येथील हॉटेलच्या खोलीत आर्चरला क्वारंटाइन राहण्यास सांगितले गेले होते. “जोफ्रा आर्चरला अज्ञात रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे आणि सोमवारी 13 जुलै रोजी त्याने होव येथील त्याच्या घरी अनधिकृत भेट दिली तेव्हा टीमच्या जैव-सुरक्षित प्रोटोकॉलचा भंग केल्याची कबुली दिल्यानंतर अधिकृत लेखी चेतावणी मिळाली.”
दुसरीकडे, नियम भाग केल्याप्रकरणी आर्चरची टीका केली जात असताना त्याचा सह-खेळाडू बेन स्टोक्सने म्हणाला की, जोफ्राला सध्या तरी पाठिंबा देण्यासाठी खरोखर तिथे असण्याची गरज आहे.” आर्चरने बायो सिक्योर प्रोटोकॉल तोडण्यासाठी जाहीरपणे माफी देखील मागितली होती. वेस्ट इंडिजविरुद्ध चार विकेटने पराभवानंतर आर्चर घरी गेला जेथे तो एका अज्ञात व्यक्तीच्या संपर्कातही आला.