ENG vs SL 2nd ODI: इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सामन्यात Dinesh Karthik याच्या कॉमेंट्रीने चाहते क्लीन बोल्ड, म्हणाला- ‘बॅट्स शेजाराच्या बायकोसारखे’ (Watch Video)
कार्तिकने इतर फलंदाजाने दुसऱ्या खेळाडूच्या बॅटच्या कौतुकाची तुलना शेजाऱ्याच्या पत्नीशी केली.
ENG vs SL 2nd ODI: दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) अजूनही सक्रीय क्रिकेटपटू असला तरी भाष्यकार म्हणून त्याने आधीच लोकप्रियता मिळवली आहे. बर्याच क्रिकेटपटू निवृत्तीनंतर कमेंटरीकडे वळले असून कार्तिकही त्या दिशेने जात असल्याचे दिसत आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल दरम्यान आपल्या कमेंटरीने प्रभावित केल्यावर कार्तिकने इंग्लंड (England) विरुद्ध श्रीलंका (Sri Lanka) एकदिवसीय मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भाष्यकार म्हणून पुन्हा एकदा क्लीन बोल्ड केलं आहे. खेळाच्या वेगवेगळ्या परिस्थितीच्या आधारे खेळाडूंची बॅट बदलण्याची गरज लक्षात घेता कार्तिकने इतर फलंदाजाने दुसऱ्या खेळाडूच्या बॅटच्या कौतुकाची तुलना शेजाऱ्याच्या पत्नीशी केली. स्काय स्पोर्ट्स (Sky Sports_ पॅनेलचा भाग म्हणून श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील दुसर्या एकदिवसीय सामन्याच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून कार्तिकने आणखी काही क्रिकेटप्रेमींना प्रभावित केले. (ENG vs SL Series 2021: ‘हे श्रीलंकेचे सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत का?’ Michael Atherton यांच्या प्रश्नावर Kumar Sangakkara ने दिली ही प्रतिक्रिया)
“फलंदाज आणि बॅट पसंत नाही करणे, हे हातात हात घालून जातात. बहुतेक फलंदाजांना त्यांची बॅट आवडत नाही. त्यांना एकतर दुसर्या व्यक्तीची बॅट आवडते किंवा…” कॉमेंट्री बॉक्समध्ये कार्तिकला बोलताना ऐकले जाऊ शकते. “बॅट्स शेजारच्या बायकोसारखे असतात. त्याच नेहमी बऱ्या वाटतात.” एका ट्विटर युजरने सामन्याची क्लिपदेखील शेअर केली होती जिथे कार्तिकला वरील प्रतिक्रिया देताना ऐकले जाऊ शकते. कार्तिकने आपल्या कमेंटरी करिअरची सुरूवात केली असतानाच चाहत्यांनी आणि सहकाऱ्यांनी त्याचे तोंडभरून कौतुक केले. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात कमेंटरी करण्याच्या आव्हानाला ज्याप्रकारे कार्तिक सामोरे गेला ते पाहून हर्षा भोगलेने देखील भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाचे कौतुक केले.
दुसरीकडे, इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचे तर इयन मॉर्गनच्या ब्रिटिश संघाने दुसर्या वनडे सामन्यात आणखी एक आरामदायक विजय मिळवत मालिकेत 2-0 अशी विजय आघाडी घेतली आहे. जो रूटने मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक झळकावले तर कर्णधार मॉर्गनने 83 चेंडूत 75 धावा फटकावल्या. 242 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने 8 गडी राखून 7 ओव्हर शिल्लक असताना विजय मिळविला. तसेच 2-0 अशी आघाडी घेत इंग्लंडने यापूर्वीच तीन सामन्यांची मालिका खिशात घातली आहे.