ENG vs PAK T20I 2021: बाबर आजमच्या ‘या’ निर्णयावर Shoaib Akhtar याला राग अनावर, म्हणाला- ‘मी PCB अध्यक्ष असतो तर...’

इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या टी-20 दरम्यान हेडिंग्ले येथे लीड्सच्या सपाट खेळपट्टीवर पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतल्याबद्दल ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ नावाने प्रसिद्ध पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने बाबर आजम आणि व्यवस्थापनाला खडेबोल सुनावले आहे. हा माजी वेगवान गोलंदाज पाकिस्तान क्रिकेट संघाचा सक्रिय टीकाकार म्हणून ओळखला जातो.

शोएब अख्तर (Photo Credit: Instagram)

ENG vs PAK T20I 2021: इंग्लंडविरुद्ध (England) दुसऱ्या टी-20 दरम्यान हेडिंग्ले (Headingly) येथे लीड्सच्या (Leeds) सपाट खेळपट्टीवर पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतल्याबद्दल ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ नावाने प्रसिद्ध पाकिस्तानचा (Pakistan) माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) बाबर आजम (Babar Azam) आणि व्यवस्थापनाला खडेबोल सुनावले आहे. माजी वेगवान गोलंदाजाने पुढे असा दावा केला आहे की जर तो पीसीबी अध्यक्ष असता तर कर्णधार आणि टीम मॅनेजमेंटला असा ‘खराब निर्णय’ घेण्यासाठी बरखास्त केले असते. बाबरच्या नेतृत्वातील पाकिस्तानने सपाट पीचवर पहिले गोलंदाजीचा निर्णय घेताच अख्तरने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आणि पहिले फलंदाजी करून चांगली धावसंख्या बनवण्याच्या संधीचा फायदा न घेण्याच्या संघाच्या निर्णयावर टीका केली. (ENG vs PAK 2nd T20I: इंग्लंडच्या Liam Livingstone ने पाकिस्तानविरुद्ध खेचला आतापर्यंतचे सर्वात मोठा षटकार? तुम्हीच पाहा आणि ठरवा)

अख्तर यांनी पोस्टला कॅप्शन देत लिहिले की, “फलंदाजीच्या खेळपट्टीवर कर्णधार आणि व्यवस्थापनाने घेतलेला पहिले गोलंदाजीचा असा खराब निर्णय, हे माझ्या बोलण्यापलीकडे आहे.” “पाकिस्तानने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा सनी दिवस आहे तेव्हा मला समजू शकत नाही आणि आपण अगोदरच्या मालिकेच्या सलामीच्या सामन्यात 232/6 धावा केल्या, मग आपण प्रथम गोलंदाजी का निवडली? ते देखील जेव्हा जोस बटलर पुनरागमन करीत आहे आणि आज सलामीला येणार. मी चुकीचा सिद्ध होऊ अशी आशा आहे, परंतु 200 पेक्षा अधिक धावसंख्येचा सामना आहे. सपाट पृष्ठभागावर पाकिस्तानला आज मालिका जिंकण्याची मोठी संधी आहे. मला आशा आहे की मी चुकीचा सिद्ध होवो,” अख्तरने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

अख्तर म्हणाला, “परंतु मी पीसीबी अध्यक्ष असतो तर टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने आणि मालिका गमावल्यामुळे मी व्यवस्थापन व कर्णधार यांना बरखास्त केले असते.” अख्तरची भविष्यवाणी खरी ठरली आणि बटलरच्या 59 धावा आणि मोईन अली व लियाम  लिविंगस्टोनच्या योगदानाने 19.5 ओव्हर मध्ये 200 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात पाकिस्तानी फलंदाजांनी चांगली सुरुवात केली पण कोणीही मोठी खेळी करू शकला नाही परिणामी संघ 155/9 धावाच करू शकला आणि 45 धावांनी पराभव पत्करावा लागला. अशाप्रकारे तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत असून आता अंतिम व निर्णायक सामना 20 जुलै रोजी (मंगळवार) मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळला जाईल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now