ENG vs PAK: 'निवृत्तीचा विचार नाही'! जेम्स अँडरसनचा अॅशेस 2021-22 पर्यंत खेळायचा निर्धार; 600 टेस्ट विकेट क्लबमध सामील होण्यापासून 10 विकेट दूर
या उन्हाळ्यात तीन सामन्यांत अँडरसनची सरासरी 41.16 आहे, परंतु आकडेवारीनुसार यथार्थपणे गोलंदाजी केली आहे.
या मोसमच्या अखेरीस कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचे इंग्लंडचा (England) 38 वर्षीय जेम्स अँडरसनने (James Anderson) म्हटले आणि पुढील हिवाळ्यातील अॅशेस (Ashes) मालिका खेळण्याचा निर्धार आहे. या उन्हाळ्यात तीन सामन्यांत अँडरसनची सरासरी 41.16 आहे, परंतु आकडेवारीनुसार यथार्थपणे गोलंदाजी केली आहे. कसोटी क्रिकेटमधील इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज, अँडरसनने क्रिकेटला निरोप दिल्याचे वृत्त समोर आले होते, पण त्याने या वृत्त फेटाळून लावले. अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये 600 विकेट घेण्यापासून दहा पाऊल दूर आहे. मात्र, शेवटच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये अँडरसनची कामगिरी अत्यंत सरासरी राहिली आणि तो केवळ 6 विकेट घेण्यास यशस्वी झाला आहे. पाकिस्तानविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात अँडरसन प्रभावी ठरला नाही आणि त्याला फक्त एक गडी बाद करता आला. (England Tour of India: यंदाचा इंग्लंडचा भारत दौरा 2021 पर्यंत स्थगित; सप्टेंबर महिन्यात होणार होती वनडे आणि टी-20 मालिका)
इंग्लंडकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या अँडरसनने सोमवारी निवृत्ती घेण्याचा कोणताही हेतू नसल्याची पुष्टी केली. "नाही नाही," तो म्हणाला. "मला अजूनही खेळाची भूक आहे. एका निराशेच्या खेळानंतर आजूबाजूला कुजबुज होते ते निराशाजनक, मला वाटत नाही की ते योग्य आहे." तथापि, ओल्ड ट्रॅफर्ड येथे पाकिस्तानविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात त्याने जितकी चांगली कामगिरी केली त्यापेक्षा चांगली गोलंदाजीची आवश्यकता असल्याचे अँडरसनने कबूल केले. त्याने सामन्यात 97 धावा देऊन एक गडी बाद केला. सध्या कसोटी क्रिकेटमाडेच 590 गडी बाद करणारा 38 वर्षीय अँडरसनला चालू मोसमात विकेट्स घेण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
या सर्वांच्या पार्श्वभूमीवर अशी अटकळ वर्तवली जात होती की, एजस बाऊल येथे पाकिस्तानविरुद्ध दुसर्या कसोटी सामन्यात त्याला विश्रांती दिली जाऊ शकते ज्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या अफवांना आणखी उत्तेजन मिळाले. त्याव्यतिरिक्त इंग्लंडने ऑली रॉबिनसनला साऊथॅम्प्टनमधील जैव-सुरक्षित बबलवर बोलावले . अशा स्थितीत अँडरसनला दुसर्या कसोटी सामन्यातून बाहेर करून रॉबिनसनला कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना सात विकेटने जिंकला. दुसर्या कसोटीपूर्वी इंग्लंडच्या संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. या संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचा पाकिस्तानविरुद्ध उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे. वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्टोक्स न्यूझीलंडला जात आहे. स्वत: स्टोक्स देखील वेस्ट इंडिजविरुद्ध दुसर्या कसोटी सामन्यात दुखापतीशी झगडत आहे आणि तो गोलंदाजीपासून दूर राहिला आहे.