The Hundred: ECB ने कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या 'द हंड्रेड' स्पर्धेत सहभागी खेळाडूंचे रद्द केले करार
कोरोना व्हायरस महामारीच्या प्रादुर्भावामुळे यापूर्वी ही स्पर्धा पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. 'द हंड्रेड'चे आयोजन यंदा 17 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान केले जाणार होते.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) 'द हंड्रेड' (The Hundred) च्या उद्घाटन आवृत्तीत भाग घेणाऱ्या खेळाडूंचे करार रद्द केले आहेत. कोरोना व्हायरस महामारीच्या (Coronavirus Pandemic) प्रादुर्भावामुळे यापूर्वी ही स्पर्धा पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. 'द हंड्रेड'चे आयोजन यंदा 17 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान केले जाणार होते. पुरुष आणि महिलांच्या स्वतंत्र स्पर्धेत आठ संघांमध्ये नवीन 100-बॉल फॉरमॅटमध्ये स्पर्धेचे आयोजन यंदा केले जाणार होते. “आम्ही याची खातरजमा करू शकतो की सध्याच्या खेळाडूंचे करारनामा रद्द करणारे पत्र आज सामील असलेल्यांना देण्यात आले आहे. हे पत्र कायदेशीररित्या अद्यतनित करण्यासाठी आणि परिस्थितीबद्दल खेळाडूंना सूचित करण्यासाठी आवश्यक कागदपत्र आहे, जे मागील आठवड्यात एका अधिसूचनेनंतर 2021 मध्ये नवीन स्पर्धा सुरू करण्याच्या आसपास आहे." ईसीबीने स्टॅट्स परफॉरमवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. (The Hundred Tournament: कोरोना व्हायरसमुळे 100-बॉल क्रिकेट स्पर्धा 'हंड्रेड टूर्नामेंट' पुढे ढकलली; आता 2021 च्या उन्हाळ्यात होणार लाँचिंग)
पुरुषांच्या स्पर्धेत फ्रँचायझींनी ऑक्टोबरच्या मसुद्यात आपली टीम आधीच निवडली होती, तर महिला संघदेखील आपल्या टीम्स पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत होते. परंतु आता स्पर्धेस उशीर झाल्याने, ईसीबीने खेळाडूंना त्यांचा करार रद्द झाल्याबद्दल माहिती दिली आहे.
अति-संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर आणि जागतिक प्रवासी निर्बंधामुळे 100-बॉल स्पर्धा गेल्या गुरुवारी पुढे ढकलण्यात आली. या आजाराने जगभरात आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 30 लाखांहून अधिक लोकं संक्रमित झाले आहेत. आरोग्याच्या संकटामुळे ईसीबीने यापूर्वी घरगुती हंगाम 1 जुलैपर्यंत स्थगित केला होता. कोविड-19 मुळे जगभरातील क्रीडाविषयक स्पर्धा स्थगित झाल्यामुळे बर्याच क्लब आणि बोर्डांना चांगलाच फटका बसला आहे. फुटबॉल क्लब आणि इतर संघ समान कारणास्तव कर्मचाऱ्यांमध्ये कपात करत आहे, तर काही खेळाडू आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी वेतन कपात करीत आहेत.