IPL मध्ये एमएस धोनी म्हातारा म्हणून काढायचा छेड, 2018 फायनलनंतर धोनीने दिलेल्या शर्यतीच्या आव्हानाचा ड्वेन ब्रावोने केला खुलासा
ब्रावो म्हणाला की आयपीएल 2018 मध्ये कर्णधार असताना धोनी बहुतेक वेळा म्हातारा म्हणून त्याची छेद काढायचा. ब्रावोने इन्स्टाग्राम लाइव्ह चॅट दरम्यान याचा खुलासा केला.
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा सध्याचा हंगाम पुढे ढकलण्यात आला आहे. हंगाम रद्द झाले असले तरी त्यासंबंधित अनेक कहाण्या दररोज समोर येत आहेत. आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्जचे (Chennai Super Kings) सदस्य फॉफ डू प्लेसिसने गुणतालिकेत सीएसके संघ मागे न राहण्याचे रहस्य उघड केले होते. आणि आता एमएस धोनीचा (MS Dhoni) दुसरा साथीदार ड्वेन ब्रावोने (Dwayne Bravo) स्वत:च्या आणि धोनीच्या एका मनोरंजक घटनेचा खुलासा केला. ब्रावो म्हणाला की आयपीएल (IPL) 2018 मध्ये कर्णधार असताना धोनी बहुतेक वेळा म्हातारा म्हणून त्याची छेद काढायचा. ब्रावोने इन्स्टाग्राम लाइव्ह चॅट दरम्यान याचा खुलासा केला. आयपीएल 2018 च्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव केल्यानंतर धोनीने पुन्हा एकदा आपल्या धावण्याच्या वेगाची चमक दाखविली. अंतिम मॅचनंतर सीएसकेच्या कर्णधाराने अष्टपैलू ब्रावोबरोबर तीन डॅशच्या तुफानी स्पर्धेत भाग घेतला आणि वेस्ट इंडियनला शर्यत जिंकण्यासाठी जोरदार झुंज दिली. (एमएस धोनीबरोबर खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिसने IPL मध्ये 'कॅप्टन कूल'च्या यशाचं रहस्य केले उघडकीस)
ब्रावो म्हणाला, "आयपीएल 2018 दरम्यान धोनी त्याला नेहमी म्हातारा म्हणून छेडत असे. तो मला खूप कंटाळवाणा म्हणायचा. मग एक दिवस मी धोनीला सांगितले की, मी आपणास विकेट्स दरम्यान धावण्याचे आव्हान करतो. तो म्हणाला - संधी नाही. मी म्हणालो- आपण स्पर्धा नंतर करू." ब्रावो पुढे म्हणाला, "आम्ही फायनल नंतर शर्यंत लावली. ही खूप जवळची शर्यत होती, अगदी जवळ होती. त्याने मला पराभूत केले. ही चांगली शर्यत होती. तो खूप वेगवान होता”. इतकेच नाही तर ब्रावोने कर्णधार धोनी आणि प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग या दोघांचेही त्यांच्या क्षमतेवर विश्वास दाखविल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
धोनी आणि ब्रावोमधील रेस
कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यामुळे पुढील नोटीस येईपर्यंत आयपीएल 2020 च सत्र पुढे ढकलण्यात आले आहे. एप्रिल ते मेची मुदत चुकली आहे, याचा विचार करून यंदा आयपीएल पुढे आयोजित केले जाईल की नाही हे पाहणे औत्सुकतेचे ठरेल. धोनी देखील तब्बल एक वर्षांनंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार होता, पण आयपीएल पुढे ढकल्यानंतर त्याचे पुनरागमन देखील लांबणीवर गेले आहे.