‘MS Dhoni Bhai Career Bhi Khatam Kar Denge’: MS Dhoni वरील बेन स्टोक्सच्या टिप्पणीवर भडकला श्रीसंत, WC सामन्यात धोनीच्या फलंदाजीवर केला होता प्रश्न
धोनीविरूद्ध केलेल्या टिप्पणीबद्दल स्टोक्सवर जोरदार टीका केली. श्रीसंतने स्टोक्सला आव्हानही दिले. श्रीसंतने स्टोक्सला आव्हान दिले आणि म्हणाला की धोनी भाऊ त्याच्याविरुद्ध खेळू नये अशी प्रार्थना त्याने करावी.
इंग्लंडमध्ये (England) 2019 पार पडलेल्या वर्ल्ड कप (World Cup) स्पर्धेच्या सेमीफायनल फेरीत न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात भारतीय संघाचं (Indian Team) आव्हान संपुष्टात आलं होतं. याआधी साखळी फेरीत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाला फक्त यजमान इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात महेंद्र सिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) केलेल्या फलंदाजीवर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने (Ben Stokes) प्रश्नचिन्ह निर्माण केलं. या सामन्यात भारतीय फलंदाजांचा खेळ स्टोक्सच्या मते रहस्यमय होता. यावर नुकत्याच झालेल्या इन्स्टाग्राम लाइव्ह सत्रादरम्यान वेगवान गोलंदाज श्रीसंतनेही (Sreesanth) या धोनीविरूद्ध केलेल्या टिप्पणीबद्दल स्टोक्सवर जोरदार टीका केली. श्रीसंतने स्टोक्सला आव्हानही दिले. श्रीसंतने स्टोक्सला आव्हान दिले आणि म्हणाला की धोनी भाऊ त्याच्याविरुद्ध खेळू नये अशी प्रार्थना त्याने करावी. हॅलो अॅपवरील थेट सत्रामध्ये श्रीसंत म्हणाला की धोनीभाईंच्या आठवणीतून काहीही जात नाही. (पाकिस्तानचे माजी दिग्गज क्रिकेटर मुश्ताक अहमद यांचा दावा, गेल-रसेल यांना माहित होते इंग्लंडविरुद्ध भारताच्या 2019 वर्ल्ड कप पराभवाचे रहस्य)
“मी फक्त इच्छा आणि प्रार्थना करतो स्टोक्सला भविष्यात कोणत्याही सामन्यात धोनीचा सामना करावा लागू नये. कारण, धोनी चुकीनाही असे क्षण विसरण्यातला नाही.” श्रीसंत म्हणाला की स्टोक्स जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू असेल परंतु धोनीला बाद करण्यात तो यशस्वी होऊ शकत नाही. धोनीबद्दल त्याच्या प्रतिक्रियांना योग्य उत्तर देण्यासाठी तो स्टोक्सविरूद्ध खरोखरच गोलंदाजीची अपेक्षा करीत असल्याचेही श्रीसंतने म्हटले. श्रीसंत म्हणाला की, "मी सर्वतोपरी शुभेच्छा देतो की सध्या 10 किंवा 20 लाख मिळत आहेत, आयपीएल किंवा इंग्लंड-भारत सामन्यात भेटला ना तर धोनी भाऊ आपलेहीकरियर संपुष्ठात आणेल. मी स्टोक्सला असे खुले आव्हान देतो की तो जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू कितीही असला तरी धोनीला आऊट करू शकत नाही."
दरम्यान, स्टोक्सने धोनीच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. “ज्यावेळी धोनी फलंदाजीसाठी मैदानात आला, त्यावेळी भारताला 11 ओव्हरमध्ये 112 धावा हव्या होत्या. यावेळी चौकार-षटकार मारण्याऐवजी धोनीचा एकेरी-दुहेरी धावा घेण्याकडे अधिक होता. त्या सामन्यात भारतीय संघ अखेरच्या दोन ओव्हरमध्येही जिंकू शकला असता. धोनी आणि केदार जाधव खेळत असताना, ते जिंकण्यासाठी खेळत आहेत असं अजिबात वाटत नव्हतं. त्यांनी फटकेबाजी करत धावा करण्याचा प्रयत्न केला असता तर भारत नक्कीच सामना जिंकू शकला असता. 'On Fire' आपल्या या पुस्तकात स्टोक्सने वर्ल्ड कपमधील भारताविरुद्ध सामन्याबद्दल लिहीलं आहे.