Women's World Cup 2021: कोरोना संकटादरम्यान होणार महिला वनडे वर्ल्ड कपचे आयोजन? न्यूझीलंड क्रिकेट दोन आठवड्यात घेणार निर्णय
आयसीसीच्या 6 एप्रिल ते 7 मार्च या कालावधीत न्यूझीलंड येथे होणाऱ्या या स्पर्धेचे वेळापत्रक कोरोना व्हायरसच्या धोक्यानंतरही बदलण्यात आले नाही, अशी प्रतिक्रिया बार्कले यांनी व्यक्त केली.
2021 महिला वनडे वर्ल्ड कपच्या (Women's World Cup) आयोजनाबाबत पुढील दोन आठवड्यांमध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल असे न्यूझीलंड क्रिकेटचे (New Zealand Cricket) अध्यक्ष ग्रेग बार्कले (Greg Barclay) यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) 6 एप्रिल ते 7 मार्च या कालावधीत न्यूझीलंड येथे होणाऱ्या या स्पर्धेचे वेळापत्रक कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) धोक्यानंतरही बदलण्यात आले नाही, अशी प्रतिक्रिया बार्कले यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, कोरोनाच्या प्रादुर्भावाने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा ऑस्ट्रेलियामधील पुरुष टी-20 वर्ल्ड कप आयसीसीला पुढे ढकलणे भाग पाडले आहे. बार्कलेने Radio New Zealand शी बोलताना म्हटले की, "वनडे विश्वचषक विषयी पुढील दोन आठवड्यांत निर्णय घेण्यात येईल." ते म्हणाले, "कारण जर ही स्पर्धा पुढे ढकलण्याची गरज असेल तर वेळीच कळणे जास्त चांगले आहे आणि त्याचप्रमाणे स्पर्धा घ्यायची असेल तर अंतिम निर्णय घेण्याची गरज आहे, जेणेकरुन आम्ही फेब्रुवारीमध्ये शानदार जागतिक स्तरीय स्पर्धा आयोजित करण्यासाठी आवश्यक संसाधने एकत्रित करू शकू." (Women's ODI World Cup 2021: ICC कडून महिला वनडे वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर, सर्व बाद फेरीसाठी असणार राखीव दिवस)
कोरोनाने सर्वात कमी प्रभावित देशांपैकी न्यूझीलंड एक आहे, परंतु तेथे आणि जगभर प्रवास प्रतिबंधित समस्या उद्भवू शकतात. बार्कले म्हणाले, "संघ जगभर कसे फिरतील, त्यांना इतर देशांतून यावे लागेल आणि त्याचा निकाल काय लागेल?" आयसीसीने सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले की, “आयसीसी बोर्ड पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलंडमध्ये आयसीसी महिला विश्वचषक 2022 स्पर्धेसाठी सक्षम होण्याच्या संदर्भातील परिस्थितीचे मूल्यांकन करत राहील. दरम्यान, या कार्यक्रमाचे नियोजन अनुसूची प्रमाणे सुरू आहे."
न्यूझीलंडसह कोविड-19 चा जागतिक प्रसार, काही प्रतिस्पर्धी देशांनी लागू केलेल्या सीमा बंद आणि क्वारंटाइनवरील निर्बंध यासारख्या अनेक समस्यांवर मात करण्याचे आवाहन आयोजकां समोर आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेत बार्कले यांना चर्चेत जास्त काळ घालवायची इच्छा नाही.