Gus Atkinson Century: दीड महिन्यापूर्वी पदार्पण, आता आठव्या क्रमांकावर येवुन झळकावले शतक; 44 वर्षांत पहिल्यांदाच घडला अशा पराक्रम
त्याने कसोटी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावले. ऍटकिन्सनने 103 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या.
England National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team 2nd Test: गुरुवारपासून म्हणजेच 29 ऑगस्टपासून इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (Sri Lanka National Cricket Team) यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना लंडनमधील लॉर्ड्स स्टेडियमवर (Lords Stadium) खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस ऍटकिन्सनने श्रीलंकेविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत शतक झळकावले. त्याने कसोटी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावले. ऍटकिन्सनने 103 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. येथे पोहोचताना त्याने 12 चौकार आणि चार षटकार मारले. आठव्या क्रमांकावर उतरून त्याने हा पराक्रम केला.
ऍटकिन्सनन 118 धावा करून बाद झाला. अशिता फर्नांडोने त्याची विकेट घेतली. ऍटकिन्सनने पाचव्या कसोटीत शतक झळकावले. याआधी 91 धावा ही त्याची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या होती. ऍटकिन्सनन हा कसोटीतील पहिले प्रथम श्रेणी शतक झळकावणारा पाचवा इंग्लिश फलंदाज आहे. त्याच्या आधी हेन्री वुड, बिली ग्रिफिथ, जॅक रसेल आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी ही कामगिरी केली आहे.
ऍटकिन्सनची लॉर्ड्सवर दमदार कामगिरी
ॲटकिन्सनने गेल्या महिन्यात म्हणजे जुलै 2024 मध्येच कसोटी क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता. विशेष म्हणजे त्याची पहिली कसोटी लॉर्ड्सवर होती आणि त्यात त्याने 12 विकेट्स घेतल्या होत्या. यात पहिल्या डावातच सात विकेट्सचा समावेश होता. लॉर्ड्सवर शतक झळकावण्याबरोबरच एका डावात पाच बळी आणि कसोटीत 10 बळी घेण्याचा चमत्कार गस ऍटकिन्सनने केला आहे. त्याच्यापूर्वी पाच इंग्लिश खेळाडूंनी ही कामगिरी केली आहे. यामध्ये गॅबी ॲलन, कीथ मिलर, स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स आणि इयान बोथम यांच्या नावांचा समावेश आहे.
ॲटकिन्सनने 44 वर्षात केला असा चमत्कार
घरच्या कसोटीत शतक झळकावणारा ॲटकिन्सन हा इंग्लंडचा 44 वर्षांतील आठव्या क्रमांकाचा पहिला फलंदाज आहे. लॉर्ड्स कसोटीत आठव्या क्रमांकावर खेळून शतक झळकावणारा वे रे इलिंगवर्थनंतरचा दुसरा इंग्लिश खेळाडू आहे. इलिंगवर्थने हा पराक्रम 1969 मध्ये केला होता. ॲटकिन्सनच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने 400 धावांचा टप्पा पार केला. त्याने आधी जो रूटसोबत 92 धावांची भागीदारी केली आणि त्यानंतर मॅथ्यू पॉट्ससोबत 85 धावा जोडल्या. या सामन्यात रूटने 143 धावा केल्या.