Dean Jones Passes Away: ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू आणि भाष्यकार डीन जोन्स यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे गुरुवारी मुंबईत स्ट्रोकमुळे निधन झाले. 59 वर्षीय डीन जोन्स इंडियन प्रीमियर लीगच्या यजमान प्रसारणकर्ते स्टार स्पोर्ट्सच्या कमेंटरी टीमचा एक भाग होते. ते मुंबईतील सात-तारांकित हॉटेलमध्ये जैव-सुरक्षित बबलमध्ये राहत होते.

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स (Photo Credit: Twitter/virendersehwag)

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स (Dean Jonas) यांचे गुरुवारी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. गुरुवारी रात्री 12 नंतर त्यांना मुंबईतील एका हॉटेलमध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे सांगितले जात आहे. 59 वर्षीय डीन जोन्स इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) यजमान प्रसारणकर्ते स्टार स्पोर्ट्सच्या (Star Sports) कमेंटरी टीमचा एक भाग होते. ते मुंबईतील (Mumbai) सात-तारांकित हॉटेलमध्ये जैव-सुरक्षित बबलमध्ये राहत होते. डीन जोन्स हे एक सक्रिय क्रिकेट विश्लेषक होते आणि सध्या युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलवर (IPL) ऑफ-ट्यूब कमेंट्री करत होते. डीन जोन्सने 1984 आणि 1992 अशा 8 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ऑस्ट्रेलियाकडून 52 कसोटी आणि 164 वनडे सामने खेळले. त्यांनी रेड बॉल क्रिकेटमध्ये 46 शतक आणि 14 अर्धशतकांसह 46.55 च्या सरासरीने 3631 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात त्यांनी 44 शतक आणि 46 अर्धशतकांसह 44.61 च्या सरासरीने 6068 धावा केल्या आहेत. (Dean Jonas Dies in Mumbai: माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांना क्रीडाविश्वातून श्रद्धांजली; सचिन तेंडुलकर, विराट कोहलीसह अनेकांनी व्यक्त केलं दु:ख)

"प्रोफेसर डिनो" म्हणून प्रसिद्ध असणारे विक्टोरियन सलामी फलंदाज त्यांच्या आक्रमक फलंदाजी शैलीसाठी प्रसिद्ध होते. जोनस 245 यांनी प्रथम श्रेणी सामन्यांत 55 शतके आणि 88 अर्धशतकांसह 51.85 च्या सरासरीने एकूण 19,188 धावा केल्या आहेत. दरम्यान, भारताचा माजी सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवागने जोन्स यांच्या निधनानंतर ट्विट करत शोक व्यक्त केला. "डीन जोन्स यांचे निधन झाल्याची बातमी ऐकून दुःख झाले. विश्वासच बसत नाही. माझ्या आवडत्या भाष्यकारांपैकी एक होते, ते माझ्या महत्वाच्या टप्प्यात ऑन-एअर होते. त्यांच्याबरोबर खरच खूप आठवणी होत्या. त्यांची आठवण येईल," सेहवागने ट्विट करत म्हटले.

त्यांनी जगातील विविध लीगवर भाष्य केले आहे आणि त्यांच्या स्पष्ट विचारांसाठी प्रख्यात आहेत. त्यांचा जन्म ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात झाला. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दी दरम्यान जोन्स ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू आणि कर्णधार एलन बॉर्डर याच्या टीमचे महत्त्वाचा सदस्य होते. त्यांनी 1984 मध्ये कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 1994 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यांनी 1986 च्या कसोटी सामन्यात त्याने भारताविरुद्ध प्रसिद्ध द्विशतक झळकावले होते. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही कसोटी मालिका टाय झाली होती.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now