DC vs RR Head to Head: दिल्लीसमोर आज राजस्थानचे आव्हान, आकेडवारीत कोण वरचढ? घ्या जाणून
अश्विन या फिरकी गोलंदाजांसह ट्रेंट बोल्ड आणि संदीप शर्मा या वेगवान गोलंदाजांचे आव्हान असणार आहे
आयपीएलमध्ये आज दिल्लीचा सामना बलाढ्य राजस्थान रॉयल्स यांच्याबरोबर होणार आहे. आजच्या सामन्यात दिल्ली संघाला कोणत्याही परिस्थितीत विजय हवाच आहे. 11 पैकी पाच सामन्यांत विजय आणि सहा सामन्यात हार अशी त्यांची परिस्थिती आहे. उर्वरित तिन्ही सामने जिंकले तरी त्यांचे जास्तीत जास्त 16 गुण होतील; परंतु एवढे गुणही त्यांना प्लेऑफसाठी पुरेसे ठरणार नाही. इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. उर्वरित दोन संघांसाठी चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात मुख्यत्वे स्पर्धा आहे. दिल्लीसाठी एकूणच मार्ग कठीण असला तरी संघाची प्रगती करत राहणे हे पंतच्या हाती आहे. ( Mumbai Indians Beat Sunrisers Hyderabad: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक; वानखेडेवर मुंबईने हैदराबादला दिला पराभवाचा धक्का)
पंत आणि फ्रेझरसमोर राजस्थानच्या युझवेंद्र चहल, आर. अश्विन या फिरकी गोलंदाजांसह ट्रेंट बोल्ड आणि संदीप शर्मा या वेगवान गोलंदाजांचे आव्हान असणार आहे. राजस्थान आणि दिल्ली यांच्यातील पहिला साखळी सामना मार्च महिन्यात राजस्थानमधील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये झाला होता. तो सामना जिंकण्याची संधी दिल्लीला होती; परंतु रियान परागने शानदार खेळी करून राजस्थानला विजय मिळवून दिला आहे.
हे दोन्ही संघ 28 वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान राजस्थान रॉयल्सने 15 सामने जिंकले आहेत. तर दिल्ली कॅपिटल्स संघाला 13 सामने जिंकता आले आहेत. राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना 207 धावा ही दिल्लीची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर 222 धावा ही राजस्थान रॉयल्स संघाची सर्वोच्च धावसंख्या आहे.