DC vs MI, IPL 2020: मुंबईची कसून गोलंदाजी; ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर दिल्ली कॅपिटल्सची 110 धावांपर्यंत मजल
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या आजच्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून कसून गोलंदाजी केली आणि दिल्लीच्या फलंदाजांना धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला.
DC vs MI, IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 51व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) टॉस गमावून पहिले फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 110 धावा केल्या आणि मुंबई इंडियन्सला (Mumbai Indian) 111 धावांचे लक्ष्य दिले. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Stadium) खेळल्या जाणाऱ्या आजच्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून कसून गोलंदाजी केली आणि दिल्लीच्या फलंदाजांना धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला. आयपीएलच्या (IPL) 13व्या हंगामात यापूर्वीच प्ले ऑफमध्ये स्थान मिळवलेल्या मुंबईसाठी त्यांची वेगवान गोलंदाजांची जोडी-ट्रेंट बोल्ट (Trent Boult) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांनी दिल्ली फलंदाजांच्या नाकीनऊ आणले. बुमराह आणि बोल्ट यांनी प्रत्येकी 2 आणि नॅथन कोल्टर-नाईल व राहुल चाहर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दुसरीकडे, मुंबईच्या वेगवान माऱ्यासमोर दिल्लीचे फलंदाज निरुत्तर दिसले. कर्णधार श्रेयस अय्यरने सार्वधिक 25 धावा केल्या, रिषभ पंत 21 आणि पृथ्वी शॉ 10 धावा करून बाद झाले. शिमरॉन हेटमायर 11 धावा करून बाद झाला. (IPL 2020 Playoffs Scenario: अब आयेगा मजा! 3 प्ले ऑफ जागांसाठी 6 संघांमध्ये चुरशीची लढत, पाहा अंतिम-4ची समीकरणे)
नाणेफेक गमावून पहिले बॅटिंगसाठी आलेल्या दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही आणि पहिल्या ओव्हरच्या तिसर्या बॉलवर संघाला मोठा धक्का बसला. बोल्टने शिखर धवनला भोपळाही न फोडू देता माघारी धाडलं. पृथ्वी शॉच्या अपयशाचे सत्र यंदा देखील कायम राहिले. त्यालाही काही खास करता आले नाही आणि 10 धावा करून कडून बोल्टच्या चेंडूवर बाद झाला. राहुल चाहरने दिल्लीला तिसरा झटका दिला आणि कर्णधार श्रेयसला 25 धावांवर क्विंटन डी कॉकच्या हाती स्टम्प आऊट केले. त्यानंतर बुमराहने दिल्लीला एकाच ओव्हरमध्ये दोन मोठे झटके दिले. मार्कस स्टोइनिस देखील 2 धाव करून बुमराहच्या पहिल्या चेंडूवर डी कॉककडे झेलबाद झाला, नंतर चौथ्या बॉलवर रिषभ पंतही पायचीत होऊन माघारी परतला. हर्षल पटेलही 5 धावा करून बुमराहचा शिकार बनला. त्यानंतर शिमरॉन हेटमायरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होत्या, पण दिल्लीच्या फलंदाजाने मोक्याच्या क्षणी निराश केले आणि 11 धावा करून परतला. आर अश्विन 12 धावा करून परतला. बोल्टच्या चेंडूवर षटकार खेचत अखेरीस कगिसो रबाडाने संघाची लाज राखली आणि धावसंख्या शंभर पार नेली. रबाडा 12 आणि प्रवीण दुबे नाबाद 7 धावा करून परतले.
आजच्या सामन्यासाठी मुंबईने प्लेइंग इलेव्हनमध्ये जयंत यादव आणि नॅथन कोल्टर-नाईल यांचा समावेश केला असून हार्दिक पांड्या आणि जेम्स पॅटिन्सन यांना विश्रांती दिली आहे. दुसरीकडे, दिल्लीने अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल आणि तुषार देशपांडे यांना बाहेर केले असून त्यांच्या जागी पृथ्वी शॉ, हर्षल पटेल आणि प्रवीण दुबे यांना संधी दिली आहे.