KKR vs DC, IPL 2020: नितिश राणाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अर्धशतकानंतर दाखवली 'सुरींदर' नावाची जर्सी, जाणून घ्या कारण
दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी केकेआरच्या आघाडीच्या फलंदाजांना मोठा धक्का दिला पण त्यानंतर नितीश राणा आणि सुनील नारायण यांनी पलटवार करत विरोधी टीमला चकित केली. राणाने यंदाच्या मोसमातील दुसरे अर्धशतक ठोकले. त्याने डावाच्या 13व्या ओव्हरमध्ये अर्धशतक झळकवले आणि त्यानंतर ‘सुरिंदर’ लिहिलेली केकेआर जर्सी हवेत झळकावली.
DC vs KKR, IPL 2020: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मधील डबल-हेडरची सुरुवात कोलकाता नाईट रायडर्स Kolkata Knight Riders) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यातील सामन्याने झाली आहे. प्रथम गोलंदाजीची निवड केल्यानंतर कॅपिटलच्या गोलंदाजांनी केकेआरच्या आघाडीच्या फलंदाजांना मोठा धक्का दिला आणि 8 ओव्हरपर्यंत केकेआरची स्थिती 42/3 अशी होती. पण त्यानंतर नितीश राणा (Nitish Rana) आणि सुनील नारायण (Sunil Narayan) यांनी पलटवार करत विरोधी टीमला चकित केली. दोंघांच्या शतकी भागीदारीने केकेआरला (KKR) 194 धावांपर्यंत मजल मारून दिली. या दरम्यान राणाने यंदाच्या मोसमातील दुसरे अर्धशतक ठोकले. त्याने डावाच्या 13व्या ओव्हरमध्ये अर्धशतक झळकवले आणि त्यानंतर ‘सुरिंदर’ (Surinder) लिहिलेली केकेआर जर्सी हवेत झळकावली. त्याने आपला डाव सुरिंदरला समर्पित करण्याच्या मार्गाने वरच्या दिशेने पाहिला. त्याच्या हावभावानंतर सुरिंदर कोण आहे आणि राणाने जर्सी का दाखविली हे जाणून चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. (KKR vs DC, IPL 2020: नितीश राणा, सुनील नारायण यांचे दमदार अर्धशतक, नाईट रायडर्सचे दिल्ली कॅपिटल्ससमोर 195 धावांचे आव्हान)
याबद्दल तपास केल्यावर आम्हाला समजले की सुरिंदर हे नितीश राणाचे सासरे आहेत (त्याची पत्नी साची मारवाहचे वडील) ज्यांचे नुकतेच कर्करोगामुळे निधन झाले. नितीश राणाचे 16 मार्च 2019 रोजी साची मारवाहशी लग्न झाले आणि सुरिंदर हे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कांस्य शिल्पकार होते. मोसमाच्या सुरुवातीला अनेक अपयशानंतर राणाने या सामन्यात सलामीला आला. त्याने सेटल होण्यासाठी काही वेळ घेतला आणि सुनील नारायण खेळपट्टीवर आल्यावर दोघांनी चौकार-षटकारांत धावा लुटल्या.
दरम्यान, डीसीविरुद्ध आजचा सामना केकेआरसाठी प्ले ऑफमध्ये जाण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे आणि नितीश राणाने आपल्या संघासाठी योग्य वेळी पुढाकार घेतला. त्याने संपूर्ण हंगामात संघर्ष केला परंतु आपल्या संघासाठी निर्णायक खेळी खेळून आजचा आपला डाव दिवंगत सासऱ्यांना अर्पण केला. अर्धशतक झळकल्यानंतर त्याच्याकडून हे खूपच चांगले जेस्चर होते आणि संपूर्ण डागआऊट त्याच्या खेळीसाठी कौतुक करण्यासाठी उभा राहिला. केकेआरसाठी पहिल्या फलंदाजी करत राणाने सार्वधिक 81 धावांचे योगदान दिले. शिवाय, नारायणसह शतकी भागीदारी करत नाईट रायडर्सना आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)