DC vs CSK, IPL 2020: एमएस धोनीने जिंकला टॉस, शारजाह येथे CSKचा पहिले फलंदाजीचा निर्णय; केदार जाधवचा सुपर किंग्स संघात समावेश

कॅपिटल्स आणि सुपर किंग्समधील आजचा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. सध्याच्या हंगामातील संघ दुसऱ्यांदा आमने-सामने येतील. आजच्या सामन्यात सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

शिखर धवन, एमएस धोनी (Photo Credit: PTI)

DC vs CSK, IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) आजच्या डबल-हेडरच्या दुसऱ्या सामन्यात एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ससमोर (Chennai Super Kings) दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) आव्हान असेल. कॅपिटल्स आणि सुपर किंग्समधील आजचा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. सध्याच्या हंगामातील संघ दुसऱ्यांदा आमने-सामने येतील. आजच्या सामन्यात सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली संघ आजचा सामना जिंकून पुन्हा गुणतालिकेत सर्वोच्च स्थानी पोहोचू इच्छित असेल, तर चेन्नई संघाला प्ले-ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी प्रत्येक पराभवात विजय बदलणे आवश्यक आहे. दरम्यान, आजच्या सामन्यासाठी दिल्लीने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही तर सुपर किंग्समध्ये एक बदल दिसत आहे. (Tushar Deshpande Quick Facts: राजस्थान रॉयल विरुद्ध सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा तुषार देशपांडे याच्याबद्दल घ्या जाणून)

सीएसकेने आजच्या सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पियुष चावलाच्या जागी केदार जाधवचा पुन्हा समावेश केला आहे.  दुसरीकडे, दिल्ली संघ पुन्हा एकदा रिषभ पंतऐवजी मैदानावर उतरेल. पंतला दुखापत झाल्याने कॅपिटल्सने त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक्स कॅरीला कायम ठेवले आहे. कर्णधार श्रेयस अय्यरने विकेटकिपर-फलंदाज रिषभ पंत ठीक असून त्याला आजच्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आले असल्याचेही सांगितले. शिखर धवन आणि पृथ्वी शॉची जोडी सलामीला उतरेल. अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मार्कस स्टोइनिस मधल्या फळीतची जबाबदारी संभातील. पॉइंट्स टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स 12 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत तर सीएसके सहाव्या क्रमांकावर आहेत.

पाहा सीएसके आणि दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्स: फाफ डुप्लेसिस, शेन वॉटसन, अंबाती रायुडू, एमएस धोनी, केदार जाधव, सॅम कुरन, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर आणि कर्ण शर्मा.

दिल्ली कॅपिटल्स: शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, अ‍ॅलेक्स कॅरी, मार्कस स्टोइनिस, अक्षर पटेल, हर्षल पटेल, एनरिच नॉर्टर्जे, कगिसो रबाडा, आर अश्विन आणि तुषार देशपांडे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif