CSK vs SRH, IPL 2020: 'डॅडी आर्मी'वर भारी पडले युवा प्रियम गर्गचे अर्धशतक, हैदराबादच्या 7 धावांच्या विजयाने चेन्नई सुपर किंग्सचा सलग तिसरा पराभव

चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएलच्या 14व्या सामन्यात एमएस धोनीच्या सीएसकेला 7 धावांनी पराभव पत्करावा लागला. 'डॅडी आर्मी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीएसकेचा हा सलग तिसरा पराभव ठरला. हैदराबादने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत दिलेल्या 165 धावांच्या प्रत्युत्तरात सीएसकेने 157 धावा केल्या. यापूर्वी, हैदराबादकडून प्रियम गर्गने आयपीएलमध्ये पहिले अर्धशतक ठोकले.

चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: Twitter/IPL)

CSK vs SRH, IPL 2020: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यातील आयपीएलच्या 14व्या सामन्यात एमएस धोनीच्या सीएसकेला (CSK) 7 धावांनी पराभव पत्करावा लागला. 'डॅडी आर्मी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीएसकेचा हा सलग तिसरा पराभव ठरला. हैदराबादने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत दिलेल्या 165 धावांच्या प्रत्युत्तरात सीएसकेने 157 धावा केल्या आणि धावांनी डेविड वॉर्नरच्या (David Warner) सनरायझर्सने दुसरा विजय नोंदवला. सीएसकेकडून कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) 47 आणि सॅम कुरन (Sam Curran) 15 धावा करून नाबाद परतले. रवींद्र जडेजाने 50 धावा केल्या. फलंदाजीने अपयशी ठरलेल्या सनरायझर्सने प्रभावी गोलंदाजी केली. फाफ डु प्लेसिसने 22 धावा केल्या. सीएसकेचे आज तीन फलंदाज दुहेरी आकडा स्पर्श करू शकले नाही. दुसरीकडे, सनरायझर्सकडून टी नटराजन 2, भुवनेश्वर कुमार आणि अब्दुल समद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. यापूर्वी, हैदराबादकडून 19-वर्षीय प्रियम गर्गने आयपीएलमध्ये पहिले अर्धशतक ठोकले. (CSK vs SRH, IPL 2020: प्रियम गर्गच्या चुकीने केन विल्यमसन रनआऊट, 'कूल' केनला वैतागलेले पाहून नेटकऱ्यांनी दिली अशी प्रतिक्रिया)

सनरायझर्सने दिलेल्या 165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत सीएसकेची सुरुवात चांगली झाली नाही. भुवनेश्वरने शेन वॉट्सनला 1 धावावर बोल्ड करून टीमला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर दुखापतीतून परतलेला अंबाती रायुडू आज 8 धावाच करू शकला. फाफ डु प्लेसिस एकीकडून खिंड लढवत असताना त्याला दुसऱ्या बाजूने मजबूत साथ मिळाली नाही. रायुडूनंतर डु प्लेसिस देखील माघारी परतला. काश्मिरी अष्टपैलू समदने 3 धावा करून खेळत असलेल्या केदार जाधवला परतीचा रास्ता दाखवला. त्यानंतर धोनी आणि जडेजाने संथ डाव खेळला जो टीमला विजयापर्यंत नेण्यासाठी पुरेसा नवहता. दोंघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. या दरम्यान जडेजाने अर्धशतक ठोकले आणि 50 धावा करून तो देखील बाद झाला.

यापूर्वी हैदराबादकडून प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्माच्या जोडीने हैदराबादला सन्मानजनक स्कोअरपर्यंत पोहोचवलं आहे. प्रियमने 26 चेंडूत नाबाद 51 रन तर अभिषेकने 24 चेंडूत 31 रन केले. यामुळे हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 164 रनपर्यंत मजल मारली. या मॅचमध्ये हैदराबादने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण याचा फायदा त्यांना करुन घेता आला नाही. सलामी फलंदाज जॉनी बेयरस्टो शून्यावर माघारी परतला. वॉर्नर आणि मनिष पांडेने हैदराबादचा डाव सावरायला सुरुवात केली, पण त्यांना मोठा डाव खेळता आला नाही.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now