CSK vs SRH, IPL 2020 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी अशा स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर थेटलाईव्ह प्रसारित केला जाईल. शिवाय, सामन्याचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीम हॉटस्टारवर उपलब्ध असेल.
CSK vs SRH, IPL 2020 Live Streaming: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 मधील 14व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची (Sunrisers Hyderabad) लढत चेन्नई सुपर किंग्जशी (Chennai Super Kings) होईल. पहिल्या तीन सामन्यात काही निराशाजनक कामगिरीनंतर दोन्ही संघ विजयी मार्गावर परतण्यासाठी आजच्या सामन्यात मैदानात उतरतील. दोन्ही टीमने तीनपैकी एका सामन्यात विजय मिळवला आहे. सीएसके (CSK) आणि एसआरएच (SRH) यांच्यातील आयपीएल (IPL) 2020 सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. सामन्याची सुरुवात भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता होईल. टॉस अर्धातास आधी म्हणजे 7:00 वाजता होईल. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी अशा स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर थेटलाईव्ह प्रसारित केला जाईल. शिवाय, सामन्याचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीम हॉटस्टारवर उपलब्ध असेल. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (IPL 2020 Points Table Updated: मुंबई इंडियन्सच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये झाले मोठे बदल, KXIPची 6व्या स्थानी घसरण)
डेविड वॉर्नरचा सनरायझर्स हैदराबाद आणि एमएस धोनीचा चेन्नई सुपर किंग्स आयपीएल गुणतालिकेत अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानावर आहे. आयपीएलमध्ये सध्या माही आणि कंपनीचा रेकॉर्ड खूपच खराब राहिला आहे. धोनीने आजवर तीन सामन्यांत फक्त एक विजय मिळविला आहे. सीएसकेने सलामीच्या सामन्यात विजय मिळवला, पण नंतर त्यांनी दोन्ही सामने गमावले. दुसरीकडे, हैदराबादने देखील पहिले दोन सामने गमावले तर दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून पहिला विजय नोंदवला.
चेन्नई सुपर किंग्स संघ: महेंद्र सिंह धोनी (कॅप्टन), अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्रावो, फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर, नारायण जगदीशन, कर्ण शर्मा, केदार जाधव, लुंगी एनगिडी, मिशेल सॅटनर, मोनू कुमार, मुरली विजय, रविंद्र जडेजा, रुतुराज गायकवाड़, शेन वॉटसन, शार्दुल ठाकुर, सॅम कुरन, पियुष चावला, जोश हेजलवुड आणि आर साइ किशोर.
सनरायझर्स हैदराबाद संघ: डेविड वॉर्नर (कॅप्टन), जॉनी बेयरस्टो, केन विल्यमसन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंह, प्रियम गर्ग, रिद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, बावनका संदीप, संजय यादव, फॅबियन एलेन, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक, टी नटराजन, बासिल थंपी.