IPL 2020: RCB कर्णधार विराट कोहलीच्या धडाकेबाज 90 धावांच्या डावावर पत्नी अनुष्का शर्माने दिला Flying Kiss, पाहून तुम्हीही म्हणाल How Sweet!
दुबईतील स्टँडवर अनुष्काची उपस्थिती नेटिझन्सच्या डोळ्यांपासून लपली नाही आणि त्यांनी ट्विटरवर बॉलिवूड अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले. विराटच्या अर्धशतकानंतर तिला चीअर करताना आणि टाळ्या वाजवताना पाहिले असता त्यात अनेकांना आढळले.
चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (Chennai Super Kings) सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार (Royal Challengers Bangalore) विराट कोहलीच्या (Virat Kohli) मास्टरक्लासनंतर अनुष्का शर्माच्या चेहर्यावरील हास्य अतुलनीय आहे. एमएस धोनीच्या सीएसकेविरुद्ध (CSK) कोहलीने नाबाद धडाकेबाज 90 धावांच्या सर्वोत्कृष्ट खेळी केली. कोणत्याही कर्णधाराने सीएसकेविरुद्ध केलेलया या सर्वाधिक धावा आहेत. कोहलीच्या तुफान फटकेबाजीच्या बळावर बेंगलोरने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 169 धावा ठोकल्या. या दरम्यान, कोहलीची पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) देखील उपस्थित होती. दुबईतील (Dubai) स्टँडवर अनुष्काची उपस्थिती नेटिझन्सच्या डोळ्यांपासून लपली नाही आणि त्यांनी ट्विटरवर बॉलिवूड अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले. विराटच्या अर्धशतकानंतर तिला चीअर करताना आणि टाळ्या वाजवताना पाहिले असता त्यात अनेकांना आढळले. (CSK vs RCB, IPL 2020: विराट कोहलीचे तुफान अर्धशतक, रॉयल चॅलेंजर्सचे CSKसमोर 170 धावांच तंगड आव्हान)
अर्धशतक गाठल्यानंतर कोहलीसुद्धा अनुष्काकडे हावभाव करून आपले प्रेम दाखविण्यास विसरला नाही. इतकंच नाही तर कोहलीच्या धडाकेबाज 90 धावांच्या डावानंतर अनुष्काने विराटला फ्लाईंग किस देखील दिले ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेव्हा कोहली नाबाद परत जात होता, तेव्हा अनुष्का विराटच्या शानदार खेळीच्या शुभेच्छा देण्यासाठी उभी राहिली. पाहा हे व्हायरल फोटोज:
अर्धशतकानंतर
अनुष्का आयपीएलच्या सुरुवातीपासूनच दुबई आहे आणि आरसीबीच्या सर्व सामन्यांमध्ये भाग घेत आहे पण तिने सीएसकेविरूद्ध कोहलीचा डाव पाहणे पसंत केले. कोहलीने 52 धावांची भव्य खेळी केली. 52 चेंडूत नाबाद 90 धावा कुटल्या. कोहलीने त्याच्या खेळीत 4 चौकार आणि तितकेच षटकार ठोकले. विराटच्या या खेळीने माजी क्रिकेटपटूनसह चाहत्यांची मनेही जिंकली आहेत. 15 ओव्हरमध्ये 95 धावा केल्यावर अखेरच्या पाच ओव्हरमध्ये आरसबीने 74 धावा लुटल्या. सीएसकेसाठी दीपक चाहरने 10 धावा देत 1 गडी बाद केला तर शार्दुल ठाकूरने 40 धावा देत 2 विकेट काढल्या. सॅम कुरनला देखील 1 विकेट मिळाली.