CSK vs GT IPL 2023 Final Live Streaming Online: कोण मारणार बाजी? चेन्नई सुपर किंग्ज की गुजरात टायटन्स, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहणार सामना?

दोन्ही संघातील हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.

CSK vs GT (Photo Credit - Twitter)

CSK vs GT:  इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023)  सोळाव्या हंगामाचा अंतिम सामना आज संध्याकाळी रंगणार आहे. गतविजेता गुजरात आणि चार वेळचा विजेता चेन्नई यांच्यामध्ये आयपीएल 2023 ची फायनल रंगणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हार्दिक पांड्या आणि धोनी यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघातील हा सामना रोमांचक होण्याची शक्यता असून या सामन्यात नाणेफेक ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार असून दोन्ही संघामध्ये चांगल्या खेळाडूंची भरणा असल्याने या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष्य असणार आहे.

पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सचा चैन्नई सुपर किग्जने पराभव केला होता. या सामन्यात चेन्नई संघाने 20 षटकांत सात गडी गमावून 172 धावा केल्या. गुजरातने फलंदाजीत काही बदल केले, पण याचा त्यांना फायदा झाला नाही. शुभमन गिलने 38 चेंडूत 42 धावा केल्या पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. गुजरात संघ 20 षटकात केवळ 157 धावा करून सर्व बाद झाला. या सामन्यात धोनीने स्टँपमागून घेतलेल्या अनेक निर्णयाचे कौतुक करण्यात आले होते. (हे देखील वाचा: CSK vs GT, IPL Final 2023: फायनलमध्ये कोण मारणार बाजी? मुंबई की गुजरात; जाणून घ्या खेळपट्टीच्या अहवालावरून कोण आहे कोणावर भारी)

कधी आणि कुठे पाहणार सामना?

गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील हा सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर विविध भाषांमध्ये केले जाणार आहे. लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅपवर उपलब्ध असेल. येथे इंग्रजी तसेच इतर भारतीय भाषांमध्ये कॉमेंट्री ऐकण्याचा पर्याय आहे. कृपया सांगा की हा सामना Jio Cinema अॅपवर विनामूल्य पाहता येईल.

दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनवर एक नजर:

गुजरात टायटन्स : शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), दासून शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी.

चेन्नई: ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश थिकशाना