CSK vs DC IPL 2021 Match 2: रिषभ पंतचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय, ‘या’ खेळाडूंचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

एमएस धोनी, रिषभ पंत (Photo Credit: Facebook)

CSK vs DC IPL 2021 Match 2: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या दुसऱ्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि दिल्ली कॅपिटल्स  (Delhi Capitals) यांच्यात ‘हायवोल्टेज’ सामना रंगणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने (Rishabh Pant) नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई आणि दिल्ली संघातील आजचा सामना ‘गुरु-चेला’ सामना म्हटला जात आहे. दुखापतीमुळे आयपीएल (IPL) 14 च्या संपूर्ण हंगामातून माघार घेतलेल्या श्रेयस अय्यरच्या जागी पंत दिल्लीचे नेतृत्वात करत आहे तर टॉम कुरन आणि क्रिस वोक्स यांनी दिल्लीकडून पदार्पण केले आहे. दुसरीकडे, चेन्नई संघाने मोईन अलीला डेब्यूची संधी दिली आहे तर मिस्टर आयपीएल सुरेश रैनाचे संघात पुनरागमन झाले आहे. रैनाने मागील वर्षी युएई येथे झालेल्या 13व्या मोसमातून माघार घेतली होती. (CSK vs DC IPL 2021 Match 2: चेन्नईविरुद्ध मैदानात उतरताच Rishabh Pant बनला आयपीएलचा 5वा युवा कर्णधार, पहा अन्य तरुण कॅप्टन्सची संपूर्ण लिस्ट)

दरम्यान, आयपीएल 14 मधील आपल्या पहिल्या मॅचमध्ये धोनीची टीम नव्या डावपेचासह मैदानात उतरल्याच दिसत आहे. चेन्नईसाठी फाफ डु प्लेसिस आणि रुतुराज गायकवाडची जोडी सलामीला येईल. सुरेश रैना आणि अंबाती रायडूवर मिडल ऑर्डरची जबाबदारी असेल तर कॅप्टन धोनी पाचव्या क्रमांकावर येईल. त्यानंतर मोईन अली, जडेजा आणि सॅम कुरनचा नंबर लागेल तर शेवटच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करण्यासाठी सीएसकेने ब्रावोचा समावेश केला आहे. दुसरीकडे, दिल्लीसाठी पृथ्वी शॉ-शिखर धवन डावाची सुरुवात करतील तर दिल्लीने शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टॉइनिस, क्रिस वोक्स, टॉम कुरन या विदेशी खेळाडूंना स्थान दिले आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा प्लेइंग इलेव्हन: एमएस धोनी (कॅप्टन), फाफ डुप्लेसी, रुतुराज गायकवाड, अंबाती रायडू, सुरेश रैना, मोईन अली, रविंद्र जडेजा, सॅम कुरन, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहर.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन: रिषभ पंत (कॅप्टन), शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, मार्कस स्टॉयनिस, शिरमन हेटमायर, क्रिस वोक्स, टॉम कुरन, रविचंद्रन अश्विन, आवेश खान आणि अमित मिश्रा.



संबंधित बातम्या

ZIM vs AFG 3rd ODI 2024 Preview: निर्णायक एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेला अफगाणिस्तानला देणार कडवी टक्कर, त्याआधी हेड-टू-हेड आणि स्ट्रीमिंगसह जाणून घ्या संपूर्ण तपशील

ZIM vs AFG 3rd Match ODI 2024 Live Streaming: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात थेट सामन्याचा आनंद कधी अन् कुठे होणार

NZ W vs AUS W 2nd ODI 2024 Preview: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड महिला संघ यांच्यात चुरशीची स्पर्धा होणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील

Rashid Khan Captain: राशिद खान झाला कर्णधार, जाणून घ्या IPL 2025 पूर्वी कोणी सोपवली जबाबदारी?

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif