CSK vs DC IPL 2021: दोन नव्या खेळाडूंचं पदार्पण, पहा कसा असेल चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य प्लेइंग XI
आयपीएल 2021 च्या दुसर्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने येतील. हा सामना खूप खास आहे कारण या सामन्यात एमएस धोनी आणि रिषभ पंत यांच्यात टक्कर होईल. दरम्यान, आपल्या पहिल्या सामन्यात दोन्ही संघात अंतिम 11 जणांमध्ये कोण-कोणते चेहरे पाहायला मिळतील याबद्दल आजबद्दल आपण एक अंदाज पाहणार आहोत.
CSK vs DC IPL 2021 Likely Playing XI: आयपीएल (IPL) 2021 च्या दुसर्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आमने-सामने येतील. हा सामना खूप खास आहे कारण या सामन्यात एमएस धोनी (MS Dhoni) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांच्यात टक्कर होईल. पंत धोनीचा उत्तराधिकारी मानला जातो आणि त्याने स्वत:ला सिद्धही केलेले आहे, परंतु कर्णधार म्हणून तो पहिल्यांदाच धोनीपुढे उभा राहणार आहे. दिल्ली संघाने मागील हंगामात फायनलमध्ये धडक मारली होती तर चेन्नईला गुणतालिकेत सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. मात्र, यंदा तीन वेळा आयपीएल विजेते सीएसकेकडून (CSK) आक्रमक खेळीची चाहत्यांना अपेक्षा असेल. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स कर्णधार पंतची फलंदाजीसह त्याच्या नेतृत्वाची देखील परीक्षा असेल. अशास्थितीत संघ दमदार प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरेल. दरम्यान, आपल्या पहिल्या सामन्यात दोन्ही संघात अंतिम 11 जणांमध्ये कोण-कोणते चेहरे पाहायला मिळतील याबद्दल आजबद्दल आपण एक अंदाज पाहणार आहोत. (IPL 2021: एमएस धोनीविरुद्ध Rishabh Pant करणार कॅप्टन्सी डेब्यू, CSK विरोधात बनवली ही विशेष योजना Watch Video)
चेन्नई सुपर किंग्स मोईन अली, कृष्णप्पा गौतम यांचा समावेश करून संघासाठी पदार्पणची संधी देऊ शकते. मोईन आली गौतमला सीएसकेने रेकॉर्ड किंमतीत खरेदी करत संघात सामील केले होते त्यामुळे या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीवर संघासह चाहत्यांचेही लक्ष लागून असेल. शिवाय, मागील सीएसके हंगामातून माघार घेतलेला सुरेश रैना संघात कमबॅक करेल. तसेच राजस्थान रॉयल्स संघासह ट्रेड केलेल्या रॉबिन उथप्पाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार असल्याचं जावपास निश्चित दिसत आहे. दुसरीकडे, कगिसो रबाडा आणि एनरिच नॉर्टजे दिल्ली कॅपिटल्ससाठी प्लेइंग इलेव्हन निवडीसाठी उपलब्ध होणार नाहीत, कारण दोन्ही खेळाडूंनी अद्याप 7 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केलेला नाही. शिवाय संघाला संपूर्ण सीजन नियमित कर्णधार श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत खेळावे लागेल. दिल्ली सीएसकेविरुद्ध स्टिव्ह स्मिथ आणि क्रिस वोक्स यांना डेब्यूची संधी देऊ शकते. स्मिथला संधी दिल्यास दिल्लीची मधली फळी मजबूत होऊ शकते तर वोक्स वेगवान रबाडाच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजीत भर घालू शकतो.
पहा चेन्नई आणि दिल्लीचा संभावित प्लेइंग इलेव्हन
सीएसके संभाव्य प्लेइंग इलेव्हन: एमएस धोनी (कॅप्टन), फाफ डु प्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायडू, रुतूराज गायकवाड, मोईन अली, सॅम कुरन, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर आणि दीपक चाहर.
डीसी संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रिषभ पंत (कॅप्टन), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, स्टीव्ह स्मिथ, शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टोइनिस, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, अमित मिश्रा आणि क्रिस वोक्स.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)