CSK vs DC, IPL 2020: एमएस धोनीने मैदानावर उतरताच केली सुरेश रैनाच्या 'या' खास विक्रमाची बरोबरी

धोनीचा सीएसके सहकारी सुरेश रैनाने आयपीएलमध्ये आजवर सर्वाधिक 193 सामने खेळले आहे. तर आज मैदानात उतरताच धोनीच्या नावावर देखील 193 आयपीएल सामने खेळण्याची नोंद झाली आहे.

एमएस धोनी आणि सुरेश रैना (Photo Credit: Instagram)

Most Matches in IPL: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यातील इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) आजच्या सामन्याच्या टॉससाठी मैदानावर उतरताच महेंद्र सिंह धोनीने विक्रमाची नोंद केली. एमएस धोनीचा (MS Dhoni) सीएसके (CSK) सहकारी सुरेश रैनाने (Suresh Raina) आयपीएलमध्ये आजवर सर्वाधिक 193 सामने खेळले आहे. तर आजच्या सामन्यात मैदानात उतरताच धोनीच्या नावावर देखील 193 आयपीएल (IPL) सामने खेळण्याची नोंद झाली आहे. या दोन खेळाडूंव्यतिरिक्त मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएलमध्ये आजवर 190 सामने खेळले आहेत. केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिकने 183 सामने, आरसीबी कर्णधार विराट कोहलीने 179, रॉबिन उथप्पाने 178 सामने खेळले आहेत. दरम्यान, धोनीच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचे तरदेशातील या प्रतिष्ठित स्पर्धेत त्याने 172 डावात 137.9 च्या स्ट्राईक रेटने 4461 धावा केल्या आहेत. (CSK vs DC, IPL 2020: एमएस धोनीने जिंकला टॉस, घेतला गोलंदाजीचा निर्णय; जोश हेजलवुडचे डेब्यू)

धोनीने आयपीएलमध्ये 23 अर्धशतक केले आहेत. याशिवाय आयपीएलमध्ये त्याची वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरी नाबाद 84 अशी आहे. आयपीएलमध्ये धोनीने 38 स्टंपिंग्ज, 101 कॅच आणि 21 रनआऊट केले आहेत. दुसरीकडे, सुरेश रैनाबद्दल बोलायचे तर सीएसकेचा हा फलंदाज वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून यंदा बाहेर पडला आहे. आयपीएलमध्ये 193 सामने खेळणार्‍या रैनाने 189 डावात 5368 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये रैनाने 38 अर्धशतक आणि एक शतक ठोकले आहेत. आयपीएलमधील रैनाची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नाबाद 100 आहे.

दरम्यान, आजच्या सामन्यात धोनीने टॉस जिंकला आणि पुन्हा पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी सीएसकेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल झाला आहे. लुंगी एनगीडीच्या जागी जोश हेजलवुडला सामील करण्यात आले आहे जो सीएसकेसाठी आपला पहिला सामना खेळेल. सीएसकेसाठी आज पुन्हा अंबाती रायुडू आणि ड्वेन ब्रावो यांना खेळण्याची संधी मिळाली नाही. दोन्ही खेळाडूंना दुखापत झाल्याने सामन्यातून बाहेर बसावे लागत आहे. आयपीएलमध्ये आजवर 21 पैकी 15 सामन्यात चेन्नईंनं विजय मिळवला आहे. मात्र दिल्लीचा यंदाचा संघ मजबूत आहे. दिल्लीनं पहिल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पंजाबविरुद्ध विजय मिळवला. तर चेन्नईनं पहिला सामना जिंकल्यानंतर दुसरा सामना राजस्थानविरुद्ध गमावला, त्यामुळे आजच्या सामन्यात सीएसके विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif