CSK Squad for IPL 2021: चैन्नई सुपर किंग्स कडून ऑक्शनसाठी खेळाडूंची नावे जाहीर, जाणून घ्या कोणाला दिला गेला डच्चू
तत्पूर्वी विविध संघाने ऑक्शनसाठी आपल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. तसेच काही खेळाडूंना सुद्धा डच्चू दिला गेला आहे. याच दरम्यान आता हरभजन सिंह याचा चैन्नई सुपर किंग्स सोबतचा प्रवास संपला आहे.
CSK Squad for IPL 2021: आयपीएलच्या 14 व्या सीजनसाठी ऑक्शन फेब्रुवारी मध्ये होणार आहे. तत्पूर्वी विविध संघाने ऑक्शनसाठी आपल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. तसेच काही खेळाडूंना सुद्धा डच्चू दिला गेला आहे. याच दरम्यान आता हरभजन सिंह याचा चैन्नई सुपर किंग्स सोबतचा प्रवास संपला आहे. तर सुरेश रैना या चैन्नईसाठी खेळणार की नाही याबद्दल स्पष्टता नव्हती. पण आता संपूर्ण स्थिती स्पष्ट झाली आहे.(IPL 2021: हरभजन सिंह याचा चेन्नई सुपर किंग्ज संघासोबतचा प्रवास थांबला)
सुरेश रैना याची खेळी सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दमदार नव्हती. तरीही त्याला सीएसकेने त्याला रिटेन केले आहे. पण यंदा सुद्धा महेंद्र सिंह धोनी सीएसकेचे कर्णधार पद भुषवणार आहे. तर आयपीलच्या 14 व्या सीजनमध्ये सीएसके संघ दमदार खेळी करण्यासाठी दमदार प्रयत्न करणार आहे. सुरेश रैना व्यतिरिक्त सीएसकेने फॉक डुप्लिसिस आणि ड्वेन ब्रावो याला ही रिटेन केले आहे. रवींद्र जडेजा, अंबाती रायडू, इमरान ताहिर, शार्दुल ठाकूर, ऋतुराज गायकवाड सारख्या खेळाडूंना रिटेन करण्यात आले आहे.
तसेच सीएसके कडून आयपीएल 2021 सीजनसाठी केदार जाधव, मुरली विजय आणि पीयूष चावला यांना रिलिज करण्यात आले आहे. या खेळाडूंनी उत्तम खेळी न केल्याने त्यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे आता हे खेळाडू आता आयपीएल 2021 च्या लिलावात भाग घेण्यासाठी स्वतंत्र आहे.(MI Squad for IPL 2021: मिनी लिलावाच्या पार्श्वभूमीवर Mumbai Indians संघाने जाहीर केली Retained आणि Released खेळाडूंची यादी; पहा कोणाला मिळाले स्थान)
सुरेश रैना, फॉफ डुप्लेसिस, ड्वेन ब्रावो, एम एस धोनी, एन जगदीशन, ऋतुराज गायकवाड, के एम आसिफ, रविंद्र जडेजा, जोस हेडलवुड, करण शर्मा, अंबाती रायडू, इमरान ताहिर, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, मिचेल सैंटनर, लुंगी नगीडी, सॅम कुर्रन, एस किशोर यांना संघात स्थान दिले गेले आहे. पण केदार जाधव, मुरली विजय, पीयूष चावला, हरभजन सिंह, शेन वॉटसन यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही.