CSK IPL 2022 Team Analysis: एमएस धोनी याच्यासाठी कही खुशी कही गम! जाणून घ्या चेन्नई सुपर किंग्स संघाची ताकद आणि कमजोरी

CSK Team Analysis: चेन्नई सुपर किंग्सने मेगा लिलावात त्यांच्या अनेक खेळाडूंना परत खरेदी केले आणि आयपीएलच्या 2022 च्या आवृत्तीपूर्वी काही नवीन चेहरे देखील जोडले. दीपक चाहर याच्या दुखापतीचा त्यांच्यावर परिणाम होणार असला तरी त्यांच्या संघात त्याची कमी भरून काढण्यासाठी अनेक पर्याय आहेत. आयपीएलच्या 15 व्या हंगामापूर्वी गतविजेत्या CSK ची ताकद आणि कमजोर बाजू जवळून जाणून घ्या.

एमएस धोनी (Photo Credit: PTI)

CSK Team Analysis IPL 2022: वानखेडे स्टेडियमवर हंगामाच्या सलामीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात काट्याची टक्कर होणार आहे. निःसंशयपणे CSK सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक आहे आणि त्याचे कारण म्हणजे एक व्यक्ती - एमएस धोनी (MS Dhoni). 2021 मध्ये आयपीएल इतिहासात प्रथमच प्लेऑफची पात्रता मिळवण्यासाठी अपयशी ठरल्यावर चेन्नई सुपर किंग्सने पुढील वर्षी स्टाईलमध्ये जोरदार पुनरागमन केले आणि आपले चौथे जेतेपद पटकावले. आणि आता, ते पुन्हा एकदा अपेक्षा पूर्ण करण्यास तयार आहेत. चेन्नईने आयपीएल (IPL) लिलावात आपल्या अनेक जुन्या खेळाडूंना पुन्हा ताफ्यात सामील केले, पण त्यांचा सर्वात महागडा दीपक चाहर (Deepak Chahar) दुखापतीमुळे सुरुवातीला काही सामन्यातून बाहेर पडल्यामुळे संघाची डोकेदुखी वाढली आहे. अशा परिस्थितीत CSK ची ताकद आणि कमजोर बाजू कोणती आहे? जाणून घ्या. (IPL 2022: चेन्नई सुपर किंग्जला विजयाचे ‘पंचक’ करायचे असल्यास ‘या’ 5 धुरंधर खेळाडूंवर असणार संघाची मदार)

ताकद: CSK ची सर्वात मोठी ताकद नेहमीच धोनी असेल. त्यांच्या यशामागे त्याचा मोठा हात आहे आणि यापुढेही तो असे करत राहील. त्याचा अनुभव अतुलनीय आहे आणि त्यामुळे तो फरक पडू शकतो. त्यांच्याकडे रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड आणि इतर काही महत्त्वाच्या खेळाडूंचाही समावेश आहे जे आयपीएलसारख्या स्पर्धेत नेहमीच मदत करतात. तसेच मोईन अली, रॉबिन उथप्पा, जडेजा, अंबाती रायुडू, धोनी, ड्वेन ब्रावो आणि शिवम दुबे यांच्या रूपात मधल्या फळीचे तज्ञ फलंदाज आहेत जे विरोधी गोलंदाजांवर गरज पडल्यास हल्लाबोल करण्यास सज्ज आहे.

कमजोरी: दीपक चाहर याची सुरुवातीच्या काही सामन्यातून बाहेर पडणे संघासाठी मोठा धक्का आहे. दीपक हंगामातील अनेक सामन्यातून बाहेर बसणार असल्यामुळे CSK गोलंदाजी विभाग थोडा कमकुवत दिसत आहे. त्यांच्याकडे ख्रिस जॉर्डन, अॅडम मिल्ने किंवा ड्वेन ब्रावो यापैकी दोघांना संधी मिळेल आणि दोन जागा भारतीय वेगवान गोलंदाजांसाठी असतील. तर चाहरच्या जागी राजवर्धन हंगरगेकर वेगवान गोलंदाजी अष्टपैलू भूमिका घेऊ शकतो. तसेच तर आसिफ किंवा तुषार देशपांडे यांच्यापैकी एक पूर्ण-वेळ वेगवान गोलंदाजाची भूमिका हाती घेईल.

चेन्नई सुपर किंग्स 2022 संघ

एमएस धोनी (कॅप्टन), मोईन अली, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, अंबाती रायुडू, ड्वेन ब्रावो, रॉबिन उथप्पा, दीपक चाहर, केएम आसिफ, तुषार देशपांडे, शिवम दुबे, महेश थेक्षाना, राजवर्धन हंगरगेकर, सिमरजीत सिंह, डेव्हन कॉन्वे, मिथुन कॉनवे, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, सुभ्रांशु सेनापती, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सी हरी निशांत, एन जगदीसन, ख्रिस जॉर्डन, के भगत वर्मा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now