CSK IPL 2022: रवींद्र जडेजा याला कॅप्टन्सी देण्यात चेन्नईने केली घाई? ‘Sir Jadeja’ च्या तुलनेत चेन्नईचा ‘हा’ वाघ होता अधिक सक्षम

आयपीएल 2022 च्या तोंडावर एमएस धोनी CSK कर्णधार पदावरून पायउतार झाला आणि रवींद्र जडेजा याच्याकडे त्याने संघाची कमान सोपवल्याची घोषणा केली. चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायझीच्या या निर्णयाने चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. पण जडेजाकडून त्यांना धोनीच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात अपयशी ठरल्यावर आता त्याला लवकर जबाबदारी सोपवली आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहे.

CSK IPL 2022: रवींद्र जडेजा याला कॅप्टन्सी देण्यात चेन्नईने केली घाई? ‘Sir Jadeja’ च्या तुलनेत चेन्नईचा ‘हा’ वाघ होता अधिक सक्षम
एमएस धोनी आणि रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

CSK IPL 2022: सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) आयपीएलच्या 17 (IPL) व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाचा पराभव करून स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. हैदराबादने शनिवारी गतविजेत्या चेन्नईचा 8 गडी राखून पराभव करत नवीन कर्णधार रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्या नेतृत्वातील संघाला आयपीएलमध्ये सलग चौथ्या पराभवाचे तोंड पाहण्यास भाग पाडले. फलंदाजांनंतर गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे चार सामन्यानंतर देखील चेन्नईची झोळी रिकामीच राहिली. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 च्या तोंडावर चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) कर्णधार पदावरून पायउतार झाला आणि जडेजा याच्याकडे त्याने संघाची कमान सोपवल्याची घोषणा केली. चेन्नई-स्थित फ्रँचायझीच्या या निर्णयाने चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. पण जडेजाकडून त्यांना धोनीच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात अपयशी ठरल्यावर आता त्याला लवकर जबाबदारी सोपवली आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच जडेजाच्या जागी चेन्नईच्या ताफ्यात असा एक खेळाडू आहे त्याच्याहून अधिक सक्षम आहे. (IPL 202, CSK vs SRH: अखेर हैदराबादचा सन‘राईज’, चेन्नईवर मात करत मिळवला पहिला विजय; जडेजाच्या ‘येलो आर्मी’चा सलग चौथा पराभव)

मुंबई इंडियन्सकडून आयपीएल पदार्पण केलेला वेस्ट इंडिजचा धाकड अष्टपैलू ड्वेन ब्रावो हा जडेजाच्या जागी चेन्नई संघाचा कर्णधार बनण्याचा अधिक सक्षम पर्याय आहे. ब्रावोने यापूर्वी यशस्वीपणे विंडीज संघाचे नेतृत्व केले आहे. तर जडेजाकडे कोणताही अनुभव नाही आहे. 2013 मध्ये त्याची वेस्ट इंडिज संगःच्या वनडे कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच त्याने 2016 पाकिस्तान सुपर लीगमधेही लाहोर कलंदर संघाने नेतृत्व केले होते. ब्राव्हो हा इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील एक स्टार आहे आणि जडेजाच्या आधीपासून चेन्नई सुपर किंग्जचा अविभाज्य सदस्य आहे. याशिवाय त्याला खेळाडू म्हणूनही फ्रँचायझीच्या अपेक्षा आणि खेळाची अधिक जण आहे, ज्यामुळे तो संघासाठी अधिक उपयुक्त ठरला असता. अगदी पहिल्या सामान्यांपासून जडेजा दडपणाखाली असल्याचे दिसत आहे, ज्यामुळे खेळाडूच नव्हे तर त्याच्या खेळावरही परिणाम झाला आहे.

दरम्यान, चेन्नई आणि हैदराबादच्या सामन्याबद्दल बोलायचे तर चेन्नईने सामन्यात 20 षटकांत 7 बाद 154 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली, पण ती हैदराबादला रोखण्यासाठी पुरेशी ठरली नाही. हैदराबादने 17.4 षटकांत दोन बाद 155 धावा करून स्पर्धेत तीन सामन्यांत पहिले दोन गुण मिळवले. या पराभवासह चेन्नईचा सलग चौथा पराभव झाला असून ते गुणतालिकेत नवव्या स्थानावर घसरले आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Apr 09, 2022 09:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).