Cricketer Rohit Sharma ने पत्नीच्या 33व्या वाढदिवसानिमित्त सोशल मिडीयावर क्यूट फोटो शेअर करत केले Romantic पद्धतीने विश; Watch Photo 

भारताचा डॅशिंगओपनिंग बॅट्समन रोहित शर्माने एक सुंदर अशी पोस्ट केली आहे. ज्याचे निमित्त आहे बायको रितिका सजदेह हीचा ३३ वा वाढदिवस.उजवा हाताचा फलंदाज जो सध्या ऑस्ट्रेलिया मध्ये quarantine आहे.त्याने आज त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर बरेच फोटो शेअर केले आहेत.ज्या फोटोमध्ये आपण रोहित त्याची बायको रितिका आणि आणि त्याची मुलगी समायरा ला  पाहू शकतो.

Cricketer Rohit  Sharma ने पत्नीच्या 33व्या वाढदिवसानिमित्त सोशल मिडीयावर क्यूट फोटो शेअर करत केले Romantic पद्धतीने विश; Watch Photo 
Photo Credits: Instagram/ Rohit Sharma

भारताचा डॅशिंग ओपनिंग बॅट्समन रोहित शर्माने (Rohit Sharma) एक सुंदर अशी पोस्ट केली आहे. ज्याचे निमित्त आहे बायको रितिका सजदेह (ritika sajdeh) हीचा ३३ वा वाढदिवस.उजवा हाताचा फलंदाज जो सध्या ऑस्ट्रेलिया मध्ये quarantine आहे.त्याने आज त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर बरेच फोटो शेअर केले आहेत.ज्या फोटोमध्ये आपण रोहित त्याची बायको रितिका आणि आणि त्याची मुलगी समायरा ला पाहू शकतो.आणि ते सर्व फोटो सुपर क्यूट आहेत.  Happy birthday darling, love you forever @ritssajdeh,” असे कॅप्शन देत रोहित ने हे सगळे फोटो शेअर केले आहेत. रोहित सध्या आपले राष्ट्रीय कर्तव्य निभवाण्यामध्ये व्यस्थ आहे त्यामुळे अर्थात तो त्याच्या बायकोला वाढदिवस साजरा करू शकत नाही.मात्र त्याने शेअर केलेल फोटो आणि कैप्शनमुळे नक्कीच त्याच्या बायकोला सुखद धक्का मिळाला असेल.

रोहित आणि रितिका ने  नुकतीच 13 डिसेंबरला आपल्या लग्नाचा 5 वाढदिवस साजरा केला होता.13 डिसेंबर 2015 रोजी लग्नगाठ बांधली होती. या दोघांची जोडी क्रिकेटजगतातील एक बेस्ट कपल म्हणून ओळखले जाते.13 डिसेंबर याच दिवशी रोहितने वनडे क्रिकेटमधलं तिसरं द्विशतकही झळकावलं होतं. तर 2017 साली मोहालीमध्ये श्रीलंकेविरुद्ध रोहितने वनडे कारकिर्दीमधलं आपलं तिसरं द्विशतक केलं होतं.रोहित आणि रितीका 6 वर्ष एकमेकांना डेट करत होते, यानंतर 13 डिसेंबर 2015 साली त्यांनी लग्न केलं. रोहितने रितीकाला वेगळ्याच पद्धतीने प्रपोज केलं होतं. रोहितने वयाच्या 11 व्या वर्षी जिकडे पहिल्यांदा हातात बॅट पकडली होती, तिकडे बोरिवली स्पोर्ट्स क्लबमध्ये रोहितने रितीकाला प्रपोज केलं होतं.

(The above story first appeared on LatestLY on Dec 21, 2020 10:23 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).