भारताचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्या होणार पिता; सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आनंदाची बातमी

भारतीय क्रिकेट संघाचा तडाखेबाज खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पिता होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने आपल्या चाहत्याला आनंदाची बातमी दिली आहे.

भारताचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्या होणार पिता; सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आनंदाची बातमी

भारतीय क्रिकेट संघाचा तडाखेबाज खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पिता होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने आपल्या चाहत्याला आनंदाची बातमी दिली आहे. नुकताच हार्दिक पांड्या यांनी त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टॅनकोविकसोबत (Natasa Stankovic) इंस्टाग्राम एक फोटो शेअर केला आहे. दरम्यान, हार्दिक पांड्याने त्याच्या लग्नाची घोषणा केली असून त्यांच्या जीवनात नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची माहिती दिली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाही हार्दिक पांड्याने त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यावेळी हार्दिकने समुद्रात एका बोटमध्ये नताशासोबत इन्गेजमेन्ट करुन इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला होता.

हार्दिकने यावर्षीच्या सुरुवातीला नशाताला खास अंदाजात प्रपोज केला होता. त्यावेळी नताशानेही हार्दिक पांड्याच्या प्रेमाला प्रतिसाद दिला होता. गेल्या अनेक वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. एवढेच नव्हेतर, हार्दिकच्या घरगुती कार्यक्रमात नताशा हजर होती. परंतु, त्यावेळी हार्दिकने या विषयावर बोलण्यास नकार दिला होता. नताशा ही बॉलिवूड कलाकार असून सर्बियाची नागरिक आहे. नच बलिए या टिव्ही शो मध्येही नताशा दिसली होती. दरम्यान हार्दिक पांड्याने नताशाला व्होट करण्याचे आवाहन देखील केले होते. हे देखील वाचा- बीसीसीआयकडून खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माची शिफारस; तर, अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन, इशांत शर्मा, दिप्ती शर्मा यांचे नामांकन

इंस्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

Natasa and I have had a great journey together and it is just about to get better 😊 Together we are excited to welcome a new life into our lives very soon. We’re thrilled for this new phase of our life and seek your blessings and wishes 🙏

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

सध्या हार्दिक पांड्याने शेअर केलेल्या फोटोमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. तसेच हार्दिक पांड्याने नताशाची कधी लग्न केले? असाही प्रश्नही त्याच्या चाहत्यांसमोर पडला आहे. तर, काही जणांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून त्याचे अभिनंदनही केले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)



Share Us