IND vs AUS T20 Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेटचा महाकुंभ उद्यापासून होणार सुरू, वेळापत्रक, लाइव्ह स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या बहुतांश वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. या टी-20 मालिकेसाठी संघाची कमान स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे.
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 संपल्यानंतर (ICC World Cup 2023) अवघ्या 4 दिवसांनी, म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेकडे टीम इंडियाच्या 2024 टी-20 विश्वचषकाच्या तयारीची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला या मालिकेसह एकूण तीन टी-20 मालिका खेळायच्या आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या बहुतांश वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. या टी-20 मालिकेसाठी संघाची कमान स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे.
टीम इंडियाची घोषणा आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 फायनलच्या दुसऱ्या दिवशी 20 नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती. पहिल्या तीन सामन्यांसाठी ऋतुराज गायकवाडची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे, तर शेवटच्या दोन सामन्यांसाठी श्रेयस अय्यरची निवड करण्यात आली असून तो संघाचा उपकर्णधारही असेल. भारताचा टी-20 कर्णधार हार्दिक पांड्या विश्वचषकादरम्यान टाचेला झालेल्या दुखापतीमुळे या मालिकेत खेळत नाही. हार्दिक पांड्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 आणि वनडे मालिकेतूनही बाहेर जाण्याची शक्यता आहे.
टी-20 मालिकेबद्दल जाणून घ्या सर्व काही
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 23 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2023 दरम्यान टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या टी-20 मालिकेत दोन्ही संघांमध्ये 5 सामने खेळवले जाणार आहेत. या टी-20 मालिकेतील सामने विशाखापट्टणम, त्रिवेंद्रम, गुवाहाटी, नागपूर आणि हैदराबाद येथे खेळवले जातील. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेत 5 सामने खेळणार आहेत. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील सामने विशाखापट्टणम, त्रिवेंद्रम, गुवाहाटी, नागपूर आणि हैदराबाद या पाच ठिकाणी खेळवले जातील. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजल्यापासून खेळवले जातील.
अशा प्रकारे सामन्याचा घ्या आनंद
तुम्ही Jio Cinema अॅप आणि वेबसाइटवर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. तुम्ही स्पोर्ट्स 18 आणि कलर्स सिनेप्लेक्स चॅनेलवर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. (हे देखील वाचा: IND vs SA Full Schedule: टीम इंडियाची खरी कसोटी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, पाहा संपूर्ण वेळापत्रक)
टी-20 मालिकेचे वेळापत्रक
23 नोव्हेंबर: टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पहिला टी-20, विशाखापट्टणम, संध्याकाळी 7 वाजता
26 नोव्हेंबर: टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुसरी टी-20, त्रिवेंद्रम, संध्याकाळी 7 वाजता
28 नोव्हेंबर: टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तिसरी टी-20, गुवाहाटी, संध्याकाळी 7 वाजता
1 डिसेंबर: टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चौथी टी-20, नागपूर, संध्याकाळी 7 वाजता
3 डिसेंबर: टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पाचवा टी-20, हैदराबाद, संध्याकाळी 7 वाजता
टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ
टीम इंडिया टी-20 संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवीदीप बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.
टीम इंडिया विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ: टीम इंडिया विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 दरम्यानच घोषित करण्यात आला होता. टी-20 मालिकेसाठी विश्वचषक खेळलेल्या ऑस्ट्रेलियन संघातील 8 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या टी-20 संघाची कमान यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडकडे सोपवण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलिया टी-20 संघ: मॅथ्यू वेड (कर्णधार), जेसन बेहरेनडॉर्फ, शीन अॅबॉट, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रॅव्हिस हेड, जोस इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्नस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झंपा.