कोरोना व्हायरसमुळे टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनावर संकट? COVID-19 च्या पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलिया प्रमुखांनी केले 'हे' मोठे विधान

चीनमधून उद्भवणार्‍या कोरोना विषाणूमुळे जगात साथीचा रोग पसरला आहे. यामुळे 7 हजाराहून अधिक लोकं मरण पावले आहेत. यामुळे आयसीसी टी-20 वर्ल्ड कपबद्दल चिंता निर्माण झाली आहे. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयसीसी टी-20 वर्ल्ड कपचे ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. पण बोर्डाने नियोजित वेळापत्रकात आगामी टी-20 विश्वचषक आयोजित करत आहे.

टी-20 वर्ल्ड कप (Photo Credit: Getty Images)

चीनमधून उद्भवणार्‍या कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) जगात साथीचा रोग पसरला आहे. यामुळे 7 हजाराहून अधिक लोकं मरण पावले आहेत. भारतातही या घातक विषाणूने पाय पसरवले आहे. या वेगाने पसरणार्‍या व्हायरसने हजारो लोकांना त्यांच्या घरात कैद केले आहे. शाळा, महाविद्यालये, मॉल्स, बस, गाड्या, विमान कंपन्या या सर्वांवर या विष्णूचा परिणाम झाला आहे. स्टेडियम असो किंवा थिएटर सर्वांमध्ये शुकशुकाट पसरला आहे. प्रत्येक देशाने आपल्या स्तरावर हा विषाणू अजून पसरवण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना करीत आहे. यामुळे आयसीसी टी-20 वर्ल्ड कपबद्दल (T20 World Cup) चिंता निर्माण झाली आहे. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयसीसी टी-20 वर्ल्ड कपचे ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) होणार आहे. पण बोर्डाने नियोजित वेळापत्रकात आगामी टी-20 विश्वचषक आयोजित करत आहे. (IPL 2020: कोरोना व्हायरसच्या वाढत्या धोक्यात आयपीएल फ्रॅन्चायसींची झाली टेली कॉन्फ्रेंस, जाणून घ्या काय घेतला निर्णय)

क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia) प्रमुख केविन रॉबर्ट्स यांनी सद्यस्थिती असूनही टी-20 विश्वचषकात कोणताही बदल होणार नसल्याची पुष्टी केली आहे. रॉबर्ट्स म्हणाले, "आम्हाला अशी आशा आहे की येत्या काही आठवड्यात किंवा काही महिन्यांत क्रिकेटचे सर्व स्वरूप खेळले जाऊ शकतील. आम्ही दोघेही या स्थितीचे फार जाणकार नाही, म्हणून आम्ही आशा करतो की टी-20 विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळला जाईल तेव्हापर्यंत आपण पुन्हा सामान्य होईल.”

18 ते 23 ऑक्टोबर दरम्यानपुरुष टी-20 विश्वचषक पूर्व-पात्रता स्पर्धा होणार असून त्यानंतर 12 ऑक्टोबरपासून 12 संघांची मुख्य स्पर्धा खेळली जाईल. अंतिम सामना 15 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये (MCG) येथे खेळला जाईल आणि सीए (CA) स्टेडियममध्ये जास्तीत जास्त प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल. कोरोना व्हायरसने जगभरात 7,000 हून अधिक लोकांचा जीव घेतला असून जवळजवळ 175,000 लोकांना संसर्गित केले आहे. ऑलिंपिक, युरो 2020 आणि कोपा अमेरिका यासारख्या अनेक चतुर्भुज कार्यक्रमांचे आयोजन होत असताना एका वर्षात जगभरातील क्रीडा स्पर्धा आयोजित केले जाणार आहे. गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यानंतर उर्वरित सामने स्थगित केले होते, तसेच दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारताची एकदिवसीय मालिकाही पुढे ढकलण्यात आली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement