सौरव गांगुली ने क्रिकेट चाहत्यांना दिला झटका, BCCI अध्यक्ष म्हणाले- 'नजीकच्या काळात क्रिकेट होणे कठीण'

भयानक जागतिक परिस्थितीत जर्मनी त्यांच्या फुटबॉल लीग बुनेस्लिगाची सुरुवात मेपासून सुरू करण्याच्या तयारीत आहे. गांगुलीने सांगितले की भारत आणि जर्मनीमधील परिस्थिती वेगळी आहे.

सौरव गांगुली (Photo Credits: Getty Images)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) नजीकच्या भविष्यात क्रिकेट होण्याची कोणतीही शक्यता नाकारली आहे. भारत सध्या 3 मे पर्यंत पूर्ण लॉकडाउनमध्ये आहे, जो यापूर्वी 14 एप्रिलपासून वाढविण्यात आला होता. भयानक जागतिक परिस्थितीत जर्मनी त्यांच्या फुटबॉल लीग बुनेस्लिगाची सुरुवात मेपासून सुरू करण्याच्या तयारीत आहे. ही लीग रिक्त स्टेडियममध्ये खेळवण्याची तयारी केली जात आहे. जागतिक स्तरावर पुन्हा एकदा क्रीडा स्पर्धा सुरू होण्याचे ठरले असतानाच, माजी भारतीय क्रिकेटपटू गांगुलीने सांगितले की भारत (India) आणि जर्मनीमधील (Germany) परिस्थिती वेगळी आहे. कोविड-19 च्या प्रसारामुळे जगभरातील सर्व क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. (COVID-19 Outbreak: कोरोना व्हायरसविरुद्ध लढाईत खेळाडूंनी दाखवला सहभाग, जाणून घ्या कोण कशाप्रकारे करत आहे मदत)

टाईम्स ऑफ इंडियाशी झालेल्या संभाषणादरम्यान गांगुली म्हणाले की, जर्मनी आणि भारताची स्थिती पूर्णपणे भिन्न आहे. “जर्मनी आणि भारताचे सामाजिक वास्तव भिन्न आहे, नजीकच्या काळात भारतात कोणतेही क्रिकेट होणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा मानवी जीवनाला धोका असताना मी खेळावर विश्वास ठेवत नाही, ”असे गांगुली यांनी टाइम्स ऑफ इंडियाला म्हटले. टीम इंडियामध्ये गांगुलीच्या नेतृत्वात फलंदाज झालेल्या हरभजन सिंहनेही आपल्या माजी कर्णधाराच्या शब्दांशी संमती दर्शवली. लस येईपर्यंत पुन्हा येऊ नये असे हरभजनचे मत आहे. “जेव्हा आयपीएलचे संघ प्रवास करतात तेव्हा स्टेडियमच्या बाहेर विमानतळ, हॉटेल, येथे प्रचंड गर्दी असते. आपण सोशल डिस्टंसिंग कायम राखण्याचा विचार करीत असताना आपण त्यांना कसे थांबवणार आहात? कोविड-19 ची लस येईपर्यंत कोणतेही क्रिकेट नसावे,” हरभजन म्हणाला.

भज्जी अलीकडेच म्हणाला की, रिक्त स्टेडियममध्ये आयपीएलचे सामने खेळता येतील, पण आता भज्जींचे मत वेगळे आहे दिसत आहे. शिवाय, दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर म्हणाले की, भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या 2020 आणि 2021 च्या स्पर्धेत आयोजनाचे हक्क अदला-बदल करू शकतात. यापूर्वी, आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढील सूचना येई पर्यंत स्थगित करण्यात आले आहे.