Coronavirus Outbreak: एमएस धोनी याची पुण्यात रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांना लाख रुपयांची मदत

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे पुण्यात रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबियांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवस संपूर्ण भारतात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर धोनीने पुण्यातील सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट मुकुल माधव फाउंडेशन, या क्राउडफंडिंग वेबसाइट केट्टोमार्फत 1 लाख रुपयांची देणगी दिली आहे.

एमएस धोनी (Photo Credits: Getty Images)

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रसारामुळे पुण्यात रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबियांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवस संपूर्ण भारतात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर धोनीने पुण्यातील सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट मुकुल माधव फाउंडेशन (Mukul Madhav Foundation), या क्राउडफंडिंग वेबसाइट केट्टोमार्फत 1 लाख रुपयांची देणगी दिल्याचे वृत्त समोर आले आहे.  भारतातील कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे पुणे हे सर्वात जास्त नुकसान झालेल्या शहरांपैकी एक आहे. कोरोना व्हायरसने आतापर्यंत 15 हून अधिक सकारात्मक रुग्णांची नोंद या शहरात झाली आहे. माजी भारतीय कर्णधाराने दिलेल्या देणगीचा उपयोग शहरातील दैनंदिन वेतन कामगारांच्या कुटुंबांना किराणा मालासाठी आवश्यक असणारी वस्तू पुरवण्यासाठी केला जाईल. फाउंडेशनने पुण्यातील अनेक कुटुंब ज्यांना धोनीच्या देणगीने मदत केली जाईल. (COVID-19 Outbreak: कोरोना व्हायरसविरुद्ध लढाईत खेळाडूंनी दाखवला सहभाग, जाणून घ्या कोण कशाप्रकारे करत आहे मदत)

या फाउंडेशनद्वारे गरजू कुटुंबांना साबण, डाळी, तांदूळ, आत्ता, तेल, धान्य, डाळी, पोहा, बिस्किटे, चहा, साखर आणि मसाले अशा किराणा आवश्यक वस्तू दिल्या जातील. दरम्यान, धोनीची पत्नी साक्षीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक मेसेज शेअर केला असून लोकांना फाऊंडेशनसाठी देणगी द्यावी आणि पुण्यातील अशा कुटुंबांना मदत करण्यास मदत करावी अशी विनंती केली. धोनी आतापर्यंत सर्वाधिक निधी देणारा आहे. त्याच्या देणगीने 12,50,000 इतकी रक्कम गोळा केली आहे.

साक्षी धोनीची इंस्टाग्राम स्टोरी (Photo Credits: Instagram)

धोनी व्यतिरिक्त सौरव गांगुली, पठाण बंधू - इरफान आणि युसुफ यांच्यासारखे इतरही संकटाच्या वेळी लोकांसाठी पुढे आले आहेत. गांगुलीने गरीबांसाठी 50 लाख रुपयांचे तांदूळ देण्याचे वचन दिले आहे, तर युसुफ आणि इरफानने व्हायरसपासून बचाव करण्यासाठी हजारो मास्क दान केले. क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, रॉजर फेडरर, राफेल नडाल आदी आंतरराष्ट्रीय खेळातील स्टार्सनेही देणगी जाहीर केली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Harbhajan Singh on Karun Nair Exclusion: करुण नायरची निवड न झाल्याने हरभजन सिंग नाराज, देशांतर्गत क्रिकेटच्या महत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित

BAN W vs NEP W, ICC Women's U19 T20 World Cup, 2025 Scorecard: अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकात बांगलादेशची विजयाने सुरुवात, नेपाळवर 5 विकेट्सने केली मात; सामन्याचा स्कोअरकार्ड येथे पाहा

ICC U19 Women's T20 World Cup Live Streaming: आयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाला आजपासून सुरुवात, भारतात कधी अन् कुठे घेणार थेट सामन्याचा आनंद; घ्या जाणून

Who Is Priya Saroj? प्रिया सरोज कोण आहे? वय, संपत्ती आणि राजकीय पार्श्वभूमी, समाजवादी पक्षाच्या खासदाराबद्दल सर्व काही घ्या जाणून, रिंकू सिंहसोबत लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे वृत्त

Share Now