Coronavirus: पाकिस्तानी हिंदूंच्या मदतीला आला शाहिद आफ्रिदी, मंदिरात आवश्यक खाद्यपदार्थांचे केले वितरण (See Photos)

अशा स्थितीत माजी पाकिस्तानी कर्णधार शाहिद आफ्रिदी त्यांच्या मदतीला आला आहे. आफ्रिदीने पाकिस्तानमधील हिंदू मंदिरात गरजा भागवल्या आहेत आणि सोशल मीडियावर त्याचे फोटोही शेअर केले आहेत.

शाहिद आफ्रिदीचं अन्न वाटप (Photo Credit: Twitter)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकट काळात अनेक खेळाडू मदतीला आले आहेत. सार्वधिक देशांमध्ये या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे आणि याच्या परिणामी लोकांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. अशा स्थितीत माजी पाकिस्तानी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) त्यांच्या मदतीला आला आहे. एकीकडे पाकिस्तान (Pakistan) सरकारने कोरोना काळात देशातील लोकांना त्यांच्या हालवर सोडले आहे. दुसरीकडे, आफ्रिदीने आपल्या 'होप नॉट आउट' या संस्थेच्या माध्यमातून तेथील गरजूंना मदत करण्यासाठी आपले काम चालू ठेवले आहे. आफ्रिदीने पाकिस्तानमधील हिंदू मंदिरात गरजा भागवल्या आहेत आणि सोशल मीडियावर त्याचे फोटोही शेअर केले आहेत. आफ्रिदी आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पाकिस्तानच्या ग्रामीण भागात जाऊन तेथील गरजूंना सतत मदत करत आहे. व्हायरसचा आरंभ झाल्यापासून त्याने मदतीची ही मोहीम पाकिस्तानच्या अनेक भागात चालविली आहे. या भागात त्याने आणि त्याच्या संस्थेने पाकिस्तानमधील हिंदू मंदिर गाठले आणि थेथे आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला. (VIDEO: सचिन तेंडुलकर याच्या बॅटने शाहिद आफ्रिदी ने मोडला होता वर्ल्ड रेकॉर्ड, जाणून घ्या आफ्रिदीपर्यंत सचिनची बॅट पोहचण्याची रंजक कहाणी)

आफ्रिदीने काही फोटो पोस्ट केले आणि लिहिले की, "आम्ही सर्व यात एकत्र आहोत आणि त्यासोबत व्यवहारही करु. ऐक्य ही आपली शक्ती आहे. लक्ष्मी नारायण मंदिरात आवश्यक वस्तू वितरित केल्या." पाकिस्तानमध्ये लॉकडाउनमुळे अनेकांचे हाल होत आहेत. हिंदूंना अन्नधान्य दिलं जात नसल्याच्या बातम्याही मध्यंतरी समोर आल्या होत्या. मात्र संकटकाळात माणुसकी हाच एक धर्म असतो हे आफ्रिदीने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.

दरम्यान, आफ्रिदीने केलेल्या चांगल्या कामाचं हरभजन सिंह आणि युवराज सिंह यांनीही कौतुक केलं. आफ्रिदीच्या या समाजकार्यात स्क्वॅश खेळाडू जहांगीर खानही मदत करत आहेत. देशातील गरजू लोकांपर्यंत मदत पोहचवण्यासाठी आदरिदी आणि त्याची संस्था दिवसरात्र कार्यरत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif