Coronavirus Effect: क्रिकेट पुन्हा सुरु झाल्यावर बॉल टेंपरिंग कायदेशीर करण्यावर ICC करू शकते विचार, वाचा सविस्तर
संपूर्ण जगाने व्यापलेल्या कोरोना व्हायरस मुळे क्रिकेटमध्येहीबरेच बदल होऊ शकतात. क्रिकेटमध्ये, गोलंदाजाला लाल बॉल चमकण्यासाठी लाळऐवजी कृत्रिम पदार्थ, म्हणजेच बॉल-टेंपरिंग, करण्याची परवानगी मिळू शकते. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आयसीसी या बाबतीवर कायदेशीर विचार करू शकते.
संपूर्ण जगाने व्यापलेल्या कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे क्रिकेटमध्येहीबरेच बदल होऊ शकतात. क्रिकेटमध्ये, गोलंदाजाला लाल बॉल चमकण्यासाठी लाळऐवजी कृत्रिम पदार्थ, म्हणजेच बॉल-टेंपरिंग (Ball Tampering), करण्याची परवानगी मिळू शकते. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आयसीसी (ICC) या बाबतीवर कायदेशीर विचार करू शकते. हे केवळ अंपायरच्या देखरेखीखाली शक्य होईल. हे सर्व बॉल टेम्परिंग मानले जाते, शिवाय कोरोना व्हायरसमुळे आता गोलंदाज ठाऊक लावून चेंडू चमकावी शकणार नाही म्हणून या नियमात बदल केला जाऊ शकतो. म्हणजेच कोरोनानंतर क्रिकेट ट्रॅकवर परतल्यानंतरच बॉल टेम्परिंगला कायदेशीर केले जाऊ शकते. (धक्कादायक! वेस्ट इंडिज संघातील खेळाडूंना जानेवारी 2020 पासून नाही मिळाली मॅच फी, जाणून घ्या कारण)
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार अंपायरच्या देखरेखीखाली कृत्रिम वस्तूंच्या वापराने चेंडू चमकू शकेल, यासाठी प्रशासक पर्याय विचारात घेत आहेत. तथापि, खेळाच्या नियमांनुसार ते बॉल टेंपरिंगच्या अधीन येते. कसोटी क्रिकेटमध्ये बॉलची चमक खूप महत्वाची असते कारण गोलंदाजांना यामुळे बॉल स्विंग आणि रिव्हर्स स्विंग करण्यास मिळविण्यात मदत होते. गुरुवारी आयसीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पीटर हार्कोर्टच्या अध्यक्षतेखाली बनवलेल्या वैद्यकीय समितीने याबाबतचे अद्यतन जाहीर केले होते. "आमची पुढची पायरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठी एक चांगला रोडमॅप तयार करणे आहे. यामध्ये क्रिकेट आणि खेळाडूंसाठी आवश्यक असणारे सर्व बदलांचा समावेश असेल."भारताचा माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसादने बॉलवर लाळ न वापरण्याच्या कल्पनेचे समर्थन केले. माजी क्रिकेटर प्रसाद यांनी पीटीआयला सांगितले की, “जेव्हा क्रिकेट पुन्हा सुरू होईल तेव्हा त्यांनी काही काळ घामाचा वापर केला पाहिजे कारण खेळाडूंची सुरक्षा सर्वोपरि आहे.”
जर हा पर्याय मंजूर झाला तर ते उपरोधिक होईल कारण स्टीव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांना बॉल टेम्परिंग केल्या प्रकरणी 2018 मध्ये एक वर्षाच्या बंदीचा सामना करावा लागला. स्मिथ, वॉर्नर आणि डेविड कॅमेरॉन यांच्यावर ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगसह अनेक दिग्गजांनी यासाठी टीका केली होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)