Coronavirus: 3TC सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिका बोर्डाने 6 कोरोना व्हायरसच्या सकारात्मक प्रकरणांची केली पुष्टी, पाहा कोण आहेत कोविड-19 पॉझिटीव्ह
खबरदारीचा उपाय म्हणून या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडू, प्रशिक्षकसमवेत अन्य लोकांची कोरोना टेस्ट करवण्यात आली ज्यातील सहा जणं पॉसिटीव्ह असल्याचे समोर आले. 3TC सामना 18 जुलै रोजी सेंच्युरियन मधील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळला जाणार आहे.
शनिवारी दक्षिण आफ्रिकामध्ये 3TC सॉलिडॅरीटी कप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. निधी जमवण्यासाठी हा सामना खेळण्यात येणार असून यास Solidarity Cup असे नाव देण्यात आले आहे. या सामन्यातून जमा झालेला निधी करोना व्हायरसमुळे कठीण परिस्थितीचा सामना करत असलेल्यांना मदत म्हणून दिला जाणार आहे. ही स्पर्धा शनिवारी, 18 जुलैला (नेल्सन मंडेला जागतिक दिवस) खेळण्यात येणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडू, प्रशिक्षकसमवेत अन्य लोकांची कोरोना टेस्ट करवण्यात आली ज्यातील सहा जणं पॉसिटीव्ह असल्याचे समोर आले. 36 ओव्हरच्या या सामन्यात एकूण तीन संघ एकाच दिवशी खेळतील. क्रिकेट दक्षिण आफ्रिकन आपल्या निवेदनात म्हटले,“क्रिकेट दक्षिण आफ्रिका (सीएसए) हे पुष्टी करू शकते की शनिवार, 18 जुलै 2020 रोजी होणाऱ्या 3 टीम क्रिकेट क्रिकेट सामन्याच्या तयारीसाठीदेशातील विविध ठिकाणी 10 ते 13 जुलै या कालावधीत खेळाडू, प्रशिक्षक, सहाय्यक आणि कार्यक्रम कर्मचार्यांवर सुमारे 19 कोविड-19 पीसीआर चाचण्या घेण्यात आल्या.” (Solidarity Cup: दक्षिण आफ्रिकेतील 3 संघांमध्ये एकाच दिवशी रंगणार क्रिकेटचा सामना, एबी डीव्हिलियर्स एका संघाचा कर्णधार; जाणून घ्या नियम)
3TC सामना 18 जुलै रोजी सेंच्युरियन मधील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळला जाणार आहे. “सहा सकारात्मक निकाल परत आले परंतु सहभागी झालेल्या कोणत्याही खेळाडूंपैकी एकही नाही. सध्याचे आरोग्य विभाग आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेशन डिसिसीज (एनआयसीडी) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्यांचे व्यवस्थापन सीएसए वैद्यकीय पथकाने केले आहे," त्यांनी पुढे म्हटले. Solidarity Cup हा नवीन क्रिकेट फॉर्मेटचा शोकेस कार्यक्रम असेल ज्यात दक्षिण आफ्रिकेच्या 24 अव्वल खेळाडू 3 संघाकडून खेळती. एबी डीव्हिलियर्स, कगीसो रबाडा आणि क्विंटन डी कॉक हे तीन संघाचे कर्णधार असतील.
प्रत्येक डावात12 ओव्हर खेळले जातील आणि सहा खेळाडू फलंदाजी करतील तर संघात एकूण 8 खेळाडू असतील. संघातील सातवा गडी बाद झाल्यावर नाबाद फलंदाज फलंदाजी करू शकेल, पण त्याला केवळ दुहेरी धाव घेता येईल. एकेरी धाव मोजली जाणार नाही. सर्वाधिक धावा करणारा संघ विजेता घोषित केला जाईल. विजेत्या खेळाडूला सुवर्णपदक, उपविजेत्या संघाला रौप्यपदक तर तिसऱ्या क्रमांकावरील संघाला कांस्यपदक प्रदान करण्यात येईल. आणि सामना टाय झाल्यास सुपर-ओव्हरने सामन्याचा निर्णय होईल. पण तीनही संघांमध्ये टाय झाल्यास तिघांनाही सुवर्णपदक देण्यात येईल.