कोहली-विल्यमसनच्या तुलनेवरून सलमान बट-Michael Vaughan मध्ये जुंपली, वॉनच्या ‘मॅच फिक्सिंग’ संबधी विधानावर पाकिस्तानी क्रिकेटपटूचा पलटवार

वॉन यांनी 2010 मॅच फिक्सिंग प्रकरणाची पाकिस्तानी क्रिकेटपटूला आठवण करून दिली. वॉनच्या ‘मॅच फिक्सर’संबधी विधानानंतर बटने पलटवार करत काही लोकांना मानसिक बद्धकोष्ठता (constipation) असते असे म्हटले.

माइकल वॉन (Photo Credit: Getty Images)

पाकिस्तानचा क्रिकेटपटू सलमान बट (Salman Butt) आणि इंग्लंडचा क्रिकेटर माइकल वॉन  (Michael Vaughan) यांच्यातील शाब्दिक लढाई अद्याप संपलेली नाही. ‘केन विल्यमसन (Kane Williamson) भारतीय असता तर तो जगातील सर्वात महान खेळाडू ठरला असता. विराट कोहली (Virat Kohli) विरोधात कुणी बोललं तर सोशल मीडियावर ट्रोल केले जाईल,’ अशा वॉनच्या या विधानानंतर संपूर्ण प्रकरण सुरु झाले. त्यानंतर, सलमान बटने या टिप्पणीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि म्हटले की वॉनने आपल्या कारकीर्दीत वनडे शतकदेखील केले नाही, परंतु वादविवादाला सुरुवात करण्याची त्यांनी कामगिरी केली आहे. त्यांनी ते हलक्यात घेतले नाही आणि 2010 मॅच फिक्सिंग (Match-Fixing) प्रकरणाची पाकिस्तानी क्रिकेटपटूला आठवण करून दिली. वॉनच्या ‘मॅच फिक्सर’संबधी विधानानंतर बटने पलटवार करत काही लोकांना मानसिक बद्धकोष्ठता (constipation) असते असे म्हटले. (ICC WTC: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे 5 सर्वात यशस्वी कर्णधार, भारतीय नव्हे ‘हा’ खेळाडू अव्वल स्थानी!)

आपल्या यू ट्यूब चॅनेलवर बट म्हणाला, “मी तपशीलात जाऊ इच्छित नाही. मला फक्त असे म्हणायचे आहे की त्याने चुकीच्या संदर्भात विषय निवडला आहे आणि या प्रकारच्या प्रतिक्रिये विषयी कोणतेही औचित्य नव्हते. जर त्याला भूतकाळात रहायचे असेल आणि त्याबद्दल बोलू इच्छित असेल, तर तो नक्कीच तसे करू शकतो. बद्धकोष्ठता हा एक आजार आहे. गोष्टी अडकतात आणि त्या सहज बाहेर येत नाहीत. काही लोकांना मानसिक बद्धकोष्ठता असते. त्याचे मन भूतकाळात आहे. परंतु मला काही फरक पडत नाही.” माजी पाकिस्तानी फलंदाजाने पुढे म्हटले की, जर वॉनने विराट कोहली आणि केन विल्यमसन यांच्यातील तुलनांबद्दल अधिक सांख्यिकीय पुरावे आणि तर्कशास्त्र दिले असते तर प्रत्येकाला काहीतरी शिकायला मिळाले असते. वॉनने क्रिकेटबद्दल बोलून स्वत: ला योग्य सिद्ध केले असते तर मजा आली असती, असेही बट म्हणाला. वॉनने निवडलेला ‘पर्याय’ तो कोणत्या प्रकारची व्यक्ती आहे हे परिभाषित करून बटने निष्कर्ष काढला.

दरम्यान, इंग्लंड दौऱ्यावर विल्यमसन व कोहली दोन्ही आपापल्या कसोटी संघांचे प्रतिनिधित्व करतील. शिवाय, दोन्ही आघाडीच्या कसोटी संघात 18 जून रोजी इंग्लंडच्या साउथॅम्प्टन येथील एजस बाउल स्टेडियमवर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना रंगणार आहे.



संबंधित बातम्या