WI vs AFG, World Cup 2019: विश्वचषकच्या अंतिम सामन्यात युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल याच अनोखं सेलिब्रेशन, कॅच घेताच मैदानावर केल्या पुश-अप्स; पहा (Photo)

गेल आणि ब्रेथवेटमध्ये पुश अप्स स्पर्धा पाहून चाहत्यांनी देखील त्यांना चीअर केलं.

(Photo Credit: Video Screen Grab)

वेस्ट इंडिज (West Indies) क्रिकेट संघाने आपल्या विश्वचषकाचा सुखद अंत केला आहे. टीमने विश्वकपमधील आपल्या सामन्यात अफगाणिस्तान (Afghanistan) संघाचा 23 धावांनी पराभव केला. यंदाच्या विश्वकपमध्ये इंडिजच्या ख्रिस गेल (Chris Gayle) याला काही खास कामगिरी करता आली नाही. गेलचा हा शेवटचा विश्वचषक सामना होता. अफगाणिस्तानविरुद्ध फलंदाजी करताना गेलने 18 चेंडूत 7 धावा केल्या. या सामन्यादरम्यान गेलने आपल्या क्षेत्ररक्षणाने चाहत्यांना खुश केले. क्षेत्ररक्षण करताना झेल घेतल्यानंतर केलेल्या सेलिब्रेशननं पुन्हा सर्वांची मने जिंकली आहेत. ख्रिस गेलनं अफगाणिस्तानच्या रहमत शाह (Rahmat Shah) चा झेल घेतल्यावर मैदानावर पुश अप्स मारल्या. (ICC World Cup 2019: एम एस धोनी या कारणामुळे सतत बदलत आहे विश्वचषकात बॅट, निवृत्तीशी निगडित आहे कारण)

रहमतने कार्लोस ब्रेथवेट (Carlos Brathwaite) याच्या गोलंदाजीवर मारलेला चेंडू गेलने झेलला आणि त्यानंतर त्याने ब्रेथवेटच्या साथीने मैदानावर पुशअप्स मारल्या. गेल आणि ब्रेथवेटमध्ये पुश अप्स स्पर्धा पाहून चाहत्यांनी देखील त्यांना चीअर केलं.

विश्वचषक 2019 मध्ये गेलने 9 सामन्यात 30.25 च्या सरासरीने 242 धावा केल्या. यात त्याला फक्त 2 अर्धशतकं करता आली. अफगाणिस्तानविरुद्ध मॅचमध्ये पहिले फलंदाजी करत वेस्ट इंडिजने 50 ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून 311 धावा केल्या. निकोलस पुरन (Nicholas Pooran) (58) आणि कर्णधार जेसन होल्डर (Jason Holder) (45) यांच्यातली भागीदारी आणि शेवटच्या षटकात ब्रॅथवाइटने मारलेल्या दोन षटकार आणि एक चौकारांसह वेस्ट इंडिजला मोठा स्कोर करण्यात यश मिळाले.