RR Vs CSK Toss Report: चेन्नई सुपर किंग्जने टॉस जिंकला; प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

या हंगामातील आज चौथी मॅच असून रायस्थान रॉयल विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जचा संघ (RR Vs CSK) शारजाह मैदानात एकमेकांशी भिडणार आहेत.

एमएस धोनी (Photo Credit: Twitter/IPL)

इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या सीजनच्या थरार सुरु झाला आहे. या हंगामातील आज चौथी मॅच असून रायस्थान रॉयल विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जचा संघ (RR Vs CSK) शारजाह मैदानात एकमेकांशी भिडणार आहेत. चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयलच्या संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलिया उत्कृष्ट फलंदाज स्टीव्ह स्मिथकडे आहे. तर, चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व पहिल्या हंगामापासूनच भारताचा माजी खेळाडू महेंद्र सिंह धोनी संभाळत आहे. राजस्थानचा संघ आज पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. तर, चेन्नई सुपर किंग्जचा संघाचा हा दुसरा सामना आहे. चेन्नईच्या संघाने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाला पराभूत करून 2 गुण प्राप्त केले आहेत.

राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना कायमच खडतर राहिला आहे, परंतु 2018 पासून आतापर्यंतच्या विक्रमाकडे नजर टाकल्यास दोन्ही संघ चार वेळा आमनेसामने आले आहेत, त्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जने तीन वेळा विजय मिळवला आहे. तर, राजस्थान रॉयल्सच्या संघाने एका सामन्यात विजय प्राप्त केला आहे. शारजाह स्टेडिअमवर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला अधिक फायदा मिळाला आहे. क्रिकइन्फोवर दिलेल्या माहितीनुसार, शारजाह स्टेडिअमवर एकूण 46 सामने खेळले गेले आहेत. ज्यात लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने 26 वेळा विजय मिळवला आहे. तसेच शारजाहचे मैदानातील पिच वेगवान गोलंदाजासाठी मदतगार आहे. या मैदानात 64 टक्के विकेट वेगवान गोलंदाजाने घेतली आहेत. हे देखील वाचा- IPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभूत झाल्यानंतर सनराइजर्स हैदराबाद संघाच्या कर्णधाराने दिली 'अशी' प्रतिक्रिया; पाहा काय म्हणाला? डेव्हिड वार्नर

संघ-

राजस्थान रॉयल-

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), जोस बटलर, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, यशस्वि जयस्वाल, मनन वोहरा, कार्तिक त्यागी, आकाश सिंग, ओशान थॉमस, अँड्र्यू टाय, डेव्हिड मिलर, टॉम कुर्रान, अनिरुद्ध जोशी , श्रेयस गोपाळ, रियान पराग, वरुण आरोन, शशांक सिंग, अनुज रावत, महिपाल लोमरर, मयंक मार्कंडे

चेन्नई सुपर किंग्ज-

एमएस धोनी (कर्णधार, विकेटकिपर), मुरली विजय, अंबाती रायडू, फाफ डू प्लेसिस, शेन वॉटसन, केदार जाधव, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, लुंगी एनगीडी, दीपक चहर, पियुष चावला, इम्रान ताहिर, मिशेल सॅटनर, जोश हेजलवुड, शार्दुल ठाकूर, सॅम कुरन, एन जगदीसन, केएम आसिफ, मोनू कुमार, आर साई किशोर, रुतूराज गायकवाड, कर्ण शर्मा



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif