IPL 2020 vs PSL 2020 Prize Money: पाहा मुंबई इंडियन्सच्या 20 कोटींच्या तुलनेत कराची किंग्सला मिळालेल्या रक्कमेचा आकडा

बक्षिसाच्या रक्कमेच्या बाबतीतही इंडियन प्रीमियर लीग पीएसएलच्या वरचढ आहे. यंदाचे आयपीएल विजेते मुंबई इंडियन्सने 20 कोटी कमावले, तर दुसरीकडे, पीएसएल 2020 च्या विजेता, कराची किंग्जला 3.75 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली.

आयपीएल आणि पीएसएल (Photo Credit: PTI/Twitter)

पाकिस्तान सुपर लीगचा (Pakistan Super League) पाचवा हंगाम आयपीएल (IPL) 2020 च्या एका आठवड्यानंतर संपुष्टात आला. कराची किंग्ज (Karachi Kings) आणि लाहोर कलंदर (Lahore Qalandars) या दोघांनी पहिल्यांदा अंतिम फेरी गाठली आणि अशाप्रकारे पीएसएलला कराची किंग्जच्या रूपात यंदा नवीन विजेता मिळाला. यंदाची स्पर्धा संपूर्णपणे पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेली पहिली आवृत्ती असल्याने याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शिवाय, कोविडमुळे लीगच्या 8 महिन्यांनंतर प्ले ऑफ स्टेज आयोजित केले गेले होते. आयपीएलला जगभरातून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे अनेक मोठे प्रायोजकही मिळतात, त्याचमुळे त्यांच्या आणि इतर स्पर्धांच्या बक्षीस रक्कमेत मोठी तफावत पाहायला मिळते. पीएसएलही याला अपवाद नाही. बक्षिसाच्या रक्कमेच्या बाबतीतही इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) पीएसएलच्या वरचढ आहे. यंदाचे आयपीएल 2020 विजेते मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 20 कोटी कमावले, तर उपविजेते दिल्ली कॅपिटल्स यांना 12.5 कोटीची रक्कम मिळाली. (IPL 2020 चे युएई येथे आयोजन करण्यासाठी BCCIने अमिराती क्रिकेट बोर्डाला कोटी रुपयांची दिली मोठी रक्कम, ऐकून तुमचे डोळे विस्फारतील)

दुसरीकडे, पीएसएल 2020 च्या विजेता, कराची किंग्जला 3.75 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली तर उपविजेते लाहोर कलंदर यांना 1.5 कोटी रुपये बक्षीस रक्कम देण्यात आली. म्हणजेच आयपीएल विजेत्या संघाला पीएसएल विजेत्यापेक्षा जवळपास 5 पटीने अधिक रक्कम तगडी मिळाली. या शिवाय, आयपीएल प्ले ऑफमध्ये पोहचणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या संघांनाही बक्षीस रक्कम दिली जाते. यंदा तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या सनरायझर्स हैदराबाद आणि चौथ्या स्थानावरील आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांना प्रत्येकी 8.75 कोटी रुपये मिळाले. दुसरीकडे पीएसएल तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघाला कोणतीही बक्षीस रक्कम दिली जात नाही. विशेष म्हणजे पीएसएलमधील संपूर्ण बक्षीस रकमेपेक्षा या दोन्ही संघांना वैयक्तिकरित्या अधिक रक्कम (17.5 कोटी) मिळाली. पीएसएलची संपूर्ण बक्षीस रक्कम 7.5 कोटी रुपये आहे.

दरम्यान, आयपीएल आणि पीएसएल यांच्यात तुलना पाहायला मिळते. आणि यंदा दोन्ही स्पर्धांमधील बक्षीस रक्कम सध्या यूजर्ससाठी चर्चेचा विजय ठरली. 134 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना किंग्जचा कर्णधार बाबर आझमने पुढाकाराने नेतृत्व केले आणि 49 धावांत नाबाद 63 धावा डाव खेळत संघाच्या पहिले पीएसएल विजेतेपद पटकावण्यात मुख्य भूमिका बजावली.