IND vs NZ Amelia Kerr Run Out Controversy: टीम इंडियासोबत झाली चीटिंग? फलंदाज बाद होऊनही पॅव्हेलियनमध्ये गेला नाही; वाचा नेमक काय घडल
वास्तविक, हा गोंधळ सामन्याच्या 14 व्या षटकात झाला जेव्हा भारतीय संघाने अमेलिया केरला धावबाद केले, तरीही पंचांनी तिला बाद घोषित केले नाही आणि केर नाबाद राहिली.
India Women's National Cricket Team vs New Zealand Women's National Cricket Team: टी-20 विश्वचषकात शुक्रवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना (IND W vs NZ W) खेळवला गेला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारताचा 58 धावांनी पराभव केला आहे. न्यूझीलंड संघाने या स्पर्धेत शानदार सुरुवात केली. तर टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक होती. दरम्यान, भारत आणि किवी संघ यांच्यातील या सामन्यातही मोठा गदारोळ पाहायला मिळाला. वास्तविक, हा गोंधळ सामन्याच्या 14 व्या षटकात झाला जेव्हा भारतीय संघाने अमेलिया केरला धावबाद केले, तरीही पंचांनी तिला बाद घोषित केले नाही आणि केर नाबाद राहिली. या निर्णयानंतर मैदानात प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला.
मैदानात झाला मोठा गदारोळ
हा संपूर्ण गदारोळ किवी संघाच्या डावाच्या 14व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर झाला. भारताकडून दीप्ती शर्मा षटक टाकत होती. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अमेलिया केरने लाँग ऑफच्या दिशेने एक शॉट खेळला आणि एक धाव घेतली. चेंडू भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या हातात गेला. हरमनने बॉल हातात धरला आणि ती बॉलरच्या दिशेने धावू लागली. हरमनने चेंडू फेकलेला नाही हे सोफी डिव्हाईनने पाहिल्यावर ती दुसऱ्या धावण्यासाठी धावली. (हे देखील वाचा: India Women vs New Zealand Women, 4th Match Scorecard: पहिल्याच सामन्यात भारताला चाखायला मिळाली पराभवाची चव, न्यूझीलंडने 58 धावांनी जिंकला सामना; फलंदाज ठरले स्पशेल अपयशी)
मात्र, सोफी धाव घेण्यापूर्वी, अंपायर दीप्तीला कॅप परत देताना दिसले आणि दुसरीकडे, सोफीला धाव घेताना पाहून हरमनने चेंडू कीपरच्या दिशेने फेकला ज्यामध्ये अमेलिया केर धावचीत झाली. धावबाद झाल्यावर अमेलिया पॅव्हेलियनकडे जाऊ लागली. त्यानंतर अंपायरने तिला थांबण्यास सांगितले आणि तिला पुन्हा क्रीजवर बोलावले. वास्तविक, अंपायरने सांगितले की दुसरी धाव घेण्यापूर्वी तो चेंडू 'डेड बाॅल' घोषित केला होता आणि त्यामुळे अमेलिया नाबाद आहे.
हरमनप्रीत आणि प्रशिक्षकाने पंचांशी घातला वाद
मात्र, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि भारतीय संघाचे सध्याचे भारतीय प्रशिक्षक अमोल मजुमदार पंचांच्या या निर्णयावर खूश दिसले नाहीत. दोघांनी अंपायरशी खूप वाद घातला, मात्र अंपायर आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि अमेलियाला नाबाद घोषित करण्यात आले. या वादामुळे बराच वेळ सामना थांबला होता. अमेलियाला मात्र या जीवदानाचा फारसा फायदा घेता आला नाही आणि पुढच्याच षटकात रेणुका सिंग ठाकूरच्या हाती झेलबाद झाली.