List of Centuries in IPL 2023: आयपीएलमध्ये शतकांचा पाऊस, आठवडाभरात 5 शतके; कोहली-क्लासेनने जिंकली चाहत्यांची मने
या मोसमातील पहिले शतक दोन आठवड्यांनंतर म्हणजेच 14 एप्रिल रोजी आले. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादच्या हॅरी ब्रूकने (Harry Brooke) नाबाद 100 धावांची खेळी केली. अशा प्रकारे एप्रिल महिन्यात एकूण 3 शतके झळकावली. पण आता आयपीएलने वेग पकडला असून गेल्या एका आठवड्यात शतकांचा पाऊस पडला.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) सीझन 31 मार्च रोजी सुरू झाला, जेव्हा गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा (GT vs CSK) पराभव केला. पण या मोसमातील पहिले शतक दोन आठवड्यांनंतर म्हणजेच 14 एप्रिल रोजी आले. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादच्या हॅरी ब्रूकने (Harry Brooke) नाबाद 100 धावांची खेळी केली. अशा प्रकारे एप्रिल महिन्यात एकूण 3 शतके झळकावली. पण आता आयपीएलने वेग पकडला असून गेल्या एका आठवड्यात शतकांचा पाऊस पडला. मे मधलं पहिलं शतक 12 तारखेला झालं. त्यानंतर 18 मे रोजी चौथे आणि पाचवे शतक झळकावले. म्हणजेच मे महिन्यात एकूण 5 शतके झाली. चालू आयपीएल हंगामात आतापर्यंत एकूण 8 शतके झळकावली आहेत.
हेनरिक क्लासेनने 51 चेंडूत केल्या 104 धावा
गुरुवारी (18 मे) सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रोमांचक सामना रंगला. या एका सामन्यात दोन शानदार शतके झळकावली. हैदराबादसाठी हेनरिक क्लासेनने प्रथम शतक झळकावले. त्यानंतर विराट कोहलीने शतक झळकावून आरसीबी संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान, एका आठवड्यात (12 ते 18 मे) एकूण 5 शतके झळकावली. 18 मे रोजी, सनरायझर्स संघाचा यष्टिरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेनने 51 चेंडूत 104 धावांचे धडाकेबाज शतक झळकावले. क्लासेनने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या खेळीत 6 षटकार आणि 8 चौकार लगावले. त्याचा स्ट्राइक रेट 203.92 होता. चालू हंगामात शतक झळकावणाऱ्या 8 खेळाडूंपैकी फक्त 2 परदेशी आहेत. त्यापैकी एक क्लासेन आहे, तर दुसरा त्याच्याच हैदराबाद संघाचा हॅरी ब्रूक आहे. यावेळी देखील हैदराबादची टीम आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे.
कोहलीने दुसऱ्या डावात धडाकेबाज शतक झळकावले
या सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावून बंगळुरू संघाचा डाव फिरवला तेव्हा चाहत्यांना दुहेरी थरार पाहायला मिळाला. कोहलीने हैदराबादविरुद्ध 63 चेंडूत 100 धावांची धडाकेबाज खेळी केली. यादरम्यान त्याने 4 षटकार आणि 12 चौकार मारले. कोहलीचे हे आयपीएलमधील सहावे शतक होते. अशा प्रकारे त्याने ख्रिस गेलच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक 6 शतके ठोकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. (हे देखील वाचा: IPL 2023 Playoffs: आरसीबीच्या विजयामुळे 'या' संघांचे वाढले टेंशन, मुंबई इंडियन्स टॉप-4 मधून बाहेर)
या मोसमात आतापर्यंत 8 शतके
14 एप्रिल - हॅरी ब्रूक (SRH vs KKR) - 100 धावा
16 एप्रिल - व्यंकटेश अय्यर (KKR vs MI) - 104 धावा
30 एप्रिल - यशस्वी जैस्वाल (RR vs MI) - 124 धावा
12 मे - सूर्यकुमार यादव (MI vs GT) - 103 धावा
13 मे - प्रभसिमरन सिंग (PBKS vs GT) - 103 धावा
15 मे - शुभमन गिल (GT vs SRH) - 101 धावा
18 मे - हेनरिक क्लासेन (SRH vs RCB) - 104 धावा
18 मे - विराट कोहली (RCB vs SRH) - 100 धावा
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)