ICC World Cup 2019: IND vs BAN सामन्यात रोहित शर्मा याच्या शतकी खेळीनंतर युवराज सिंह याने घेतली केव्हिन पीटरसन याची फिरकी
युवराजच्या या ट्विटवर इंग्लंडच्या माजी खेळाडू केव्हिन पीटरसन ने त्याला चिडवले आणि मग तर काय, युवराज ने त्याची मग घ्यायची संधी सोडली नाही.
आयसीसी (ICC) विश्वकप मध्ये आज भारत (India) विरुद्ध बांग्लादेश (Bangladesh) संघात रोमांचक लढत एजबस्टन (Edgbaston) येथे होत आहे. टॉस जिंकत भारताने पहिले फलंदाजी करत बांग्लादेशी गोलंदाजांना धुवून काढले. मॅचमध्ये उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ने अविस्मरणीय खेळी करत महत्वाची भूमिका निभावली. रोहितने यंदाच्या विश्वकपमधील आपले चौथे शतक ठोकले. शिवाय रोहितने के.एल राहुल (KL Rahul) च्या साथीने संघाला दमदार सुरुवात करून दिली. रोहित-राहुलने 180 धावांची भागीदारी केली. रोहितच्या 26 व्या शतकानंतर त्याचे कौतुक करण्यासाठी माजी क्रिकेटपटू युवराज सिंह (Yuvraj Singh) ने ट्विटरवर त्याचे अभिनंदन केले. (Team India ला प्रोत्साहन देताना पिपाणीवाल्या आजीबाईचा क्युटनेस पाहून सौरभ गांगुली, हर्षा भोगले यांच्यासह Social Media फिदा)
युवराज ने लिहिले, "आणि यासह रोहित शर्मा आयसीसी 'मॅन ऑफ द टूर्नामेंट' ट्रॉफीच्या अजून जवळ आला. हिटमॅन तुम्ही शानदार आहे, स्पर्धेतील चौथे शतक, खूप चांगला खेळला चॅम्पियन!!" युवराजच्या या ट्विटवर इंग्लंडच्या माजी खेळाडू केव्हिन पीटरसन (Kevin Pietersen) ने त्याला चिडवले आणि यूवीच्या पोस्टवर टिप्पणी करताना लिहिले, "इंग्लंड ने विश्वकप जिंकला तर नाही, पाय-चकर". आणि मग तर काय, युवराज ने त्याची मग घ्यायची संधी सोडली नाही. पीटरसनला सडेतोड उत्तर देत युवराज म्हणाला, "आधी क्वालिफाय तर करा, जिंकल्याच्या गोष्टी मग करा आणि तसही मी 'मॅन ऑफ द सीरीसबद्दल बोलत होतो, विश्वचषक जिंक्यबद्दल नाही... !!"
खरंच, सिक्सर किंग युवराजने आपल्या उत्तरासह पीटरसन ची बोलतीच बंद करून टाकली. दरम्यान, भारताने बांग्लादेश समोर जिंकण्यासाठी 315 धावांचे आव्हान दिले आहेत. भारतासाठी रोहितने के एल राहुल च्या साथीने शतकी भागिदारी करत टीम ला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.