Bushfire Bash: रिकी पॉन्टिंग याला कर्टनी वॉल्श यांच्या Moon-Ball च्या मागे धाव घेताना पाहून तुम्हाच्याही हसण्यावर राहणार नाही नियंत्रण, पाहा Video
ऑस्ट्रेलियामधील बुशफायर क्रिकेट सामन्यादरम्यान एक वेळ असा होता की भाष्यकर्तेसुद्धा त्यांचे हसणे थांबवू शकले नाहीत. रिकी पॉन्टिंग इलेव्हनच्या फलंदाजीच्या वेळी कर्टनी वॉल्श मॅचचा पाहिला चेंडू फेकला ज्याच्यावर ते नियंत्रण ठेवू शकले नाही. वॉल्शचा हा चेंडू एक बीमर ठरला जो वेगळ्या दिशेने गेला आणि फलंदाज पॉन्टिंगसह यष्टीरक्षक गिलक्रिस्टनेही या चेंडूच्या मागे धाव घेतली.
ऑस्ट्रेलियामधील बुशफायर क्रिकेट सामना रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) आणि एडम गिलक्रिस्ट (Adam Gilchrist) च्या संघात जंक्शन ओव्हलमध्ये खेळला गेला. बुशफायर क्रिकेट बॅशने (Bushfire Cricket Bash) क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला. यात ज्यात सचिन तेंडुलकर, वसीम अकरम, ब्रायन लारा, पॉन्टिंग, गिलक्रिस्ट, युवराज सिंह समवेत विश्व क्रिकेटमधील मोठ्या खेळाडूंनी सहभाग घेतला. या बॅशमध्ये चाहत्यांना त्यांच्या आवडत्या दिग्गज खेळाडूंना पुन्हा एकदा क्रिकेट खेळताना पाहायाला मिळाले. सामन्यादरम्यान प्रत्येक क्षण उत्साहपूर्ण होता, परंतु एक वेळ असा होता की भाष्यकर्तेसुद्धा त्यांचे हसणे थांबवू शकले नाहीत. पॉन्टिंग इलेव्हनच्या फलंदाजीच्या वेळी कॅप्टन पॉन्टिंगने हे दाखवून दिले की अजूनही त्याच्याकडे खेळण्याची आवड आहे, पण या सर्वामुळे सर्वांना हसण्याची संधी दिली. ही घटना गिलख्रिस्ट इलेव्हनमध्ये वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज कर्टनी वॉल्श (Courtney Walsh) गोलंदाजी करताना घडली. (Video: सचिन तेंडुलकर याने 5 वर्षानंतर केली बॅटिंग; बुशफायर बॅशमध्ये एलिसे पेरी, अॅनाबेल सदरलँडविरुद्ध दाखवला दम)
वॉल्श यांनी मॅचचा पाहिला चेंडू फेकला ज्याच्यावर ते नियंत्रण ठेवू शकले नाही. वॉल्शचा हा चेंडू एक बीमर ठरला जो वेगळ्या दिशेने गेला आणि फलंदाज पॉन्टिंगसह यष्टीरक्षक गिलक्रिस्टनेही या चेंडूच्या मागे धाव घेतली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या ट्विटरवरून हा मजेदार व्हिडिओ शेअर केला. वेस्ट इंडिजचा दिग्गज ब्रायन लाराला संधी देण्यापूर्वी पॉन्टिंग चांगला खेळ करताना दिसला. पाहा हा व्हिडिओ:
यापूर्वी बुशफायर क्रिकेट बॅश एक दिवस अगोदर आयोजित करण्यात आला होता, म्हणजेच 08 फेब्रुवारी (शनिवार) रोजी, परंतु सिडनीमध्ये मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे सिडनीहून मेलबर्नमध्ये हलवण्यात आला. ऑस्ट्रेलियातील बुशफायर घटनेमुळे बाधित लोकांच्या मदतीसाठी निधी गोळा करण्यासाठी हा सामना होत असताना, मोठ्या संख्येने प्रेक्षक जमा झाले होते. शिवाय, प्रेक्षकांसाठी खास आकर्षण म्हणजे भारताचा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) तब्बल पाच वर्षानंतर बॅट हातात धरली आणि फलंदाजी केली. एलिसे पेरीने सामन्याआधी सचिनला एक ओव्हर खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती जी सचिनने मान्य केली. सचिनने अनेक वर्षानंतर फलंदाजी केली असली तरीही त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले की तो आधी प्रमाणेच फलंदाजी करू शकतो.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)