IND vs AUS 3rd Test 2024 Day 4 Stumps: बुमराह-आकाशने केला चमत्कार, फॉलोऑनचा धोका टळला; चौथ्या दिवसाअखेर भारताच स्कोर 252/9
जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप यांनी 10व्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी केली. दोघांनीही कमालीचे धाडस दाखवत फॉलोऑन टाळला. भारताची नववी विकेट पडली तेव्हा टीम इंडियाला फॉलोऑन वाचवण्यासाठी 33 धावांची गरज होती. भारताची धावसंख्या आता 9 विकेट्सवर 252 धावा आहे
Australia Men's National Cricket Team vs Indian National Cricket Team: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात पाच कसोटी सामन्याच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील द गाबा येथे खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. दरम्यान, चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप यांनी 10व्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी केली. दोघांनीही कमालीचे धाडस दाखवत फॉलोऑन टाळला. भारताची नववी विकेट पडली तेव्हा टीम इंडियाला फॉलोऑन वाचवण्यासाठी 33 धावांची गरज होती. भारताची धावसंख्या आता 9 विकेट्सवर 252 धावा आहे. भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियाच्या 193 धावांनी मागे आहे. आकाशदीप 27 आणि बुमराह 10 धावांवर नाबाद आहे.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांनी पहिल्या डावात शतकी खेळी खेळली. ट्रॅव्हिस हेडने 160 चेंडूत 152 धावांची जबरदस्त खेळी केली. या खेळीत हेडने 18 चौकार मारले. तर स्मिथने 190 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने 101 धावा केल्या.
याशिवाय यष्टीरक्षक ॲलेक्स कॅरीने 70 धावा, उस्मान ख्वाजा 21 धावा, पॅट कमिन्स 20 धावा, मिचेल स्टार्क 18 धावा, नॅथन मॅकस्वीनी 9 धावा, मार्नस लॅबुशेन 12 धावा आणि मिचेल मार्शने 5 धावा केल्या. भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी करत आपले पंजे उघडले. बुमराहने 28 षटकात 76 धावा देत 6 बळी घेतले. तर मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि नितीश रेड्डी यांना 1-1 बळी मिळाला.