Bhutan vs Bahrain ICC Mens T20 World Cup Asia Qualifier B 2024 Live Streaming: आज भूतान आणि बहरीन यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात कधी आणि कुठे पाहणार लाइव्ह मॅच
भूतानने या स्पर्धेत आतापर्यंत 3 सामने खेळले असून तिन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. याशिवाय भूतानचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे.
Bhutan National Cricket Team vs Bahrain National Cricket Team ICC Mens T20 World Cup Asia Qualifier B 2024 Live Streaming: आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक आशिया पात्रता ब 2024 चा 10 वा सामना आज 23 नोव्हेंबर रोजी भूतान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बहरीन राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भूतानने या स्पर्धेत आतापर्यंत 3 सामने खेळले असून तिन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. याशिवाय भूतानचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. दुसरीकडे, बहरीन संघाने स्पर्धेत आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. ज्यामध्ये एकाने विजय तर एकाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना अपेक्षित आहे.
किती वाजता सुरु होणा सामना?
भूतान विरुद्ध बहरीन यांच्यातील आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक आशिया पात्रता ब 2024 मधील 10 वा सामना आज, शनिवार, 23 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 11:30 वाजता दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. (हे देखील वाचा: IPL Mega Auction 2025 Live Streaming: किती वाजता सुरु होणार लिलाव? तुम्ही कोणत्या टीव्ही चॅनेल आणि ओटीटी पाहणार लाइव्ह? एका क्लिकवर जाणून संपूर्ण महिती)
कुठे पाहणार लाइव्ह सामना
भूतान विरुद्ध बहरीन यांच्यातील आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक आशिया पात्रता B 2024 च्या 10 व्या सामन्याचे थेट प्रवाह फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर भारतात उपलब्ध असेल. मात्र, कोणत्याही टीव्ही चॅनलवर या सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार नाही.
दोन्ही संघाचे खेळाडू
बहरीन संघ : उमर तूर, आसिफ अली, इम्रान अन्वर, फियाज अहमद, हैदर बट (कर्णधार), सोहेल अहमद, अहमर बिन नासेर (विकेटीकीपर), जुनैद अजीज, अब्दुल मजीद, अली दाऊद, इम्रान खान, रिझवान बट, शाहबाज बदर, सचिन कुमार, मुहम्मद सलमान
भूतान संघ : सुप्रित प्रधान, तेन्झिन राब्गे, जिग्मे सिंगे, रांजुंग मिक्यो दोरजी, थिनले जमत्शो, गकुल घली (कर्णधार), तेन्झिन वांगचुक, नामगे थिनले, शेरिंग ताशी (विकेटकीपर), कर्मा दोरजी, सोनम येशे, दावा दावा, सोनम चोफेल, शेराब लोडे