RCB vs SRH, IPL 2024 30th Match: बंगलोर विजयी मार्गावर परतण्यासाठी आतुर, आज होणार हैदराबादशी टक्कर; जाणून घ्या हेड टू हेड आकडेवारी
आरसीबीने आयपीएल 2024 मध्ये 6 पैकी 5 सामने गमावले आहेत आणि फक्त 1 सामना जिंकला आहे. यासह, ते 2 गुणांसह गुणतालिकेत तळाच्या 10व्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, हैदराबादने 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत, तर 2 सामने गमावले आहेत. ते 6 गुणांसह गुणतालिकेत 5 व्या क्रमांकावर आहेत.
RCB vs SRH, IPL 2024: आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद (RCB vs SRH) सोमवार, 15 एप्रिल रोजी आमनेसामने येणार आहेत. एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल. या लेखात जाणून घ्या आतापर्यंत दोन्ही संघांमधील संघर्षात कोणाचा वरचा हात आहे. आरसीबीने आयपीएल 2024 मध्ये 6 पैकी 5 सामने गमावले आहेत आणि फक्त 1 सामना जिंकला आहे. यासह, ते 2 गुणांसह गुणतालिकेत तळाच्या 10व्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, हैदराबादने 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत, तर 2 सामने गमावले आहेत. ते 6 गुणांसह गुणतालिकेत 5 व्या क्रमांकावर आहेत. (हे देखील वाचा: RCB vs SRH, IPL 2024 30th Match Live Streaming: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज होणार लढत, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह)
जाणून घ्या कोण आहे वरचढ?
आरसीबी आणि आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 23 वेळा आमनेसामने आले आहेत. या कालावधीत सनरायझर्स हैदराबादने 12 वेळा आरसीबीचा पराभव केला आहे. तर, बंगलोर ने एकूण 10 सामन्यांमध्ये हैदराबादचा पराभव केला आहे. दोन्ही संघांमधील एक सामनाही अनिर्णित राहिला आहे. हैदराबादने आरसीबी विरुद्ध सर्वाधिक 231 धावा केल्या आहेत. तर, आरसीबीने हैदराबाद विरुद्ध सर्वाधिक 227 धावा केल्या आहेत.
दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल/कॅमरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रीस टोपली, विजयकुमार विशाक, आकाश दीप, मोहम्मद सिराज
सनरायझर्स हैदराबाद: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी. नटराजन
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)