RCB vs RR Pitch And Weather Report: एलिमिनेटरमध्ये आज बंगळुरु-राजस्थान आमनेसामने, वाचा कसे असेल हवामान आणि खेळपट्टी अहवाल

याआधीही येथे अनेक सामने खेळले गेले आहेत, त्यामुळे ट्रॅक आणखी संथ झाला असावा, असे मानले जात आहे. पण इथे फलंदाजांनीही भरपूर धावा केल्या आहेत. यंदाच्या आयपीएलच्या सात सामन्यांपैकी एक सामना पावसामुळे वाहून गेला.

RR vs RCB (Photo Credit - X)

RCB vs RR IPL 2024 Eliminator: आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Cricket Stadium) संध्याकाळी 7.30 पासून हा सामना खेळवला जाईल. हा सामना जिंकणाऱ्या संघाला क्वालिफायर 2 च्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना करावा लागेल. जो संघ हरेल तो बाहेर जाईल. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये कडवी स्पर्धा होणार आहे. (हे देखील वाचा: RR vs RCB Head to Head: कोणाला मिळणार अंतिम फेरीत जाण्याची संधी? बंगळुरु विरुद्ध राजस्थान एलिमिनेटर सामना; पाहा हेड टू हेड आकडेवारी)

जाणून घ्या खेळपट्टी अहवाल

अहमदाबादची खेळपट्टी गोलंदाजांसाठी उपयुक्त असल्याचे मानले जाते. याआधीही येथे अनेक सामने खेळले गेले आहेत, त्यामुळे ट्रॅक आणखी संथ झाला असावा, असे मानले जात आहे. पण इथे फलंदाजांनीही भरपूर धावा केल्या आहेत. यंदाच्या आयपीएलच्या सात सामन्यांपैकी एक सामना पावसामुळे वाहून गेला. विशेष म्हणजे 200 पेक्षा जास्त धावा फक्त दोनदाच झाल्या आहेत. गुजरात टायटन्स संघ येथे एकदा केवळ 89 धावांवर बाद झाला होता, हेही लक्षात घ्यायला हवे. अशा स्थितीत इथे पुन्हा 200 हून अधिक धावा केल्या जातील असा विचार करत असाल तर बहुधा तसे होणार नाही. पण 180 च्या आसपास धावा करताना दोन्ही संघ दिसु शकतात.

सामन्याच्या दिवशी कसे असेल हवामान ?

चाहत्यांसाठी चांगली गोष्ट म्हणजे आरआर विरुद्ध आरसीबी एलिमिनेटर सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता कमी आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, अहमदाबादचे हवामान आल्हाददायक असेल आणि दिवस ऊन असेल. दिवसेंदिवस उष्मा वाढेल आणि पावसाची शक्यता खूपच कमी आहे. हवामानाचा अंदाज लक्षात घेता चाहत्यांना पूर्ण 40 षटकांचा सामना पाहायला मिळेल.