BCCI सचिव जय शाह यांचा रमीज राजाला दिला दणका, PCB अध्यक्षच्या ‘4-राष्ट्रीय T20I मालिके’ स्पर्धेच्या प्रस्तावावर मोठी प्रतिक्रिया, पहा काय म्हणाले
तत्पूर्वी, राजा म्हणाले की, भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिका यशस्वी होईल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी जानेवारीमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (Pakistan Cricket Board) प्रमुख रमीज राजा (Ramiz Raja) यांनी मांडलेल्या भारत (India), पाकिस्तान (Pakistan), इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 देशांच्या T20I सुपर सीरिजचा प्रसारक फेटाळला आहे. गेल्या महिन्यात राजा यांनी चार देशांच्या T20 स्पर्धेबद्दल विचार मांडला होता ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांचाही समावेश होता. यावर बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह यांनी या मालिकेबद्दल प्रतिक्रिया दिली आणि काही काळासाठी आर्थिक फायदा घेण्यासाठी हे पाऊल असल्याचे वर्णन केले आहे. राजा या मालिकेबद्दल मार्चमध्ये प्रस्ताव मांडणार आहेत. द्विपक्षीय मालिका आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचे त्यामागचे त्यांचे म्हणणे आहे. (IND vs PAK Series: भारतासोबत क्रिकेट खेळण्याचा विचारात PCB अध्यक्ष रमीज राजा, जाणून घ्या कशाची करताहेत तयारी)
रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना जय शाह म्हणाले की जगभरातील क्रिकेट संस्थांच्या प्रमुखांचे हित हे क्रिकेटच्या खेळाचा विस्तार करण्यावर असायला हवे आणि ते ‘अल्पकालीन व्यावसायिक उपक्रम’ पेक्षा महत्त्वाचे आहे. राजा म्हणाले की ते आयसीसीकडे 4-राष्ट्रीय स्पर्धेचा प्रस्ताव ठेवतील आणि म्हणाले की अशा स्पर्धेतील नफा टक्केवारीच्या आधारावर सर्व आयसीसी सदस्यांसह शेअर केला जाऊ शकतो. उल्लेखनीय म्हणजे भारत-पाकिस्तान मधील संबंध तणावामुळे 2012-13 हंगामापासून दोन्ही देशांच्या क्रिकेट संघात द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळली गेली नाही. तथापि, आयसीसी स्पर्धांमध्ये दोन्ही संघाचे सामने खूप गाजले आणि कोणत्याही स्पर्धेतील मोठे सामने ठरले आहेत. “आयपीएल विंडो विस्तारत असताना आणि सायकलमध्ये दरवर्षी आयसीसी (जागतिक) स्पर्धांमुळे, कसोटी क्रिकेटवर भर देऊन, द्विपक्षीय क्रिकेटचे रक्षण करणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे,” जय शाह म्हणाले. “मी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट पाहण्यास उत्सुक आहे, कारण यामुळे खेळ वाढण्यास मदत होईल. खेळाचा विस्तार करणे हे आमच्या खेळासमोरील आव्हान आहे आणि आम्ही कोणत्याही अल्पकालीन व्यावसायिक उपक्रमापेक्षा याला प्राधान्य दिले पाहिजे.”
दरम्यान, विश्वचषक 2019 स्पर्धेच्या गट टप्प्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केले परंतु गेल्या वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्ध्यांकडून त्यांना प्रथमच पराभव पत्करावा लागला. आणि आता येत्या 23 ऑक्टोबर रोजी MCG वर आगामी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ पुन्हा एकमेकांशी भिडणार आहेत.