Khel Ratna Award 2020: रोहित शर्माऐवजी केवळ 3 क्रिकेटपटूंनाच मिळाला क्रीडा क्षेत्रातला मानाचा सन्मान, वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराचाही आहे समावेश
भारतीय क्रीडा क्षेत्रातील मानाचा पुरस्कार म्हणून ओळख असलेल्या राजीव गांधी खेळरत्न सन्मान आजवर फक्त 3 भारतीय क्रिकेटपटूंना मिळाला आहे. यामध्ये भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या एका कर्णधाराचाही समावेश आहे.
बीसीसीआयने (BCCI) खेळ रत्न पुरस्कारासाठी (Khel Ratna Award) यंदा भारताचा सलामी फलदांज फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नावाची शिफारस केली आहे. गेल्या वर्षी विश्वचषक स्पर्धेदरम्यान केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर रोहित या पुरस्काराचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. गतवर्षी विश्वचषकात रोहितने सलग पाच शतकं ठोकून इतिहास रचला होता. तथापि, भारतीय क्रीडा क्षेत्रातील मानाचा पुरस्कार म्हणून ओळख असलेल्या राजीव गांधी खेळरत्न सन्मान आजवर फक्त 3 भारतीय क्रिकेटपटूंना मिळाला आहे. यामध्ये भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या एका कर्णधाराचाही समावेश आहे. शिवाय, रोहितची जर यंदा या पुरस्कारासाठी निवड झाली तर हा मान मिळवणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरेल. वर्ल्ड कपमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या रोहितने मागील वर्षी दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटी सामन्यातून सलामी फलंदाज म्हणून सुरुवात केली होती. रोहितने आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये मधल्याफळीतील फलंदाज म्हणून पदार्पण केले होते. (बीसीसीआयकडून खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माची शिफारस; तर, अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन, इशांत शर्मा, दिप्ती शर्मा यांचे नामांकन)
दरम्यान, भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरला 1997-1998 मध्ये खेल रत्न देण्यात आला. हा मान मिळवणारा सचिन पहिला क्रिकेटपटू होता.सचिननंतर 2007 मध्ये एमएस धोनीला हा सन्मान मिळाला होता. त्यावेळी धोनीच्या नेतृत्वात भारताने पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. धोनीनंतर 2018 मध्ये विराट कोहलीला खेल रत्न मिळाला. कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया दररोज नव्या यशाची शिखरं सर करत आहे. मात्र, यंदा रोहितला हा सन्मान मिळविणे इतके सोपे नाही, कारण अन्य फेडरेशनने या रत्नासाठी आपल्या स्टार खेळाडूंची नावे पाठविली आहेत. यात सर्वात आघाडीचे नाव म्हणजे 22 वर्षीय भालाफेक नीरज चोप्रा.
शिवाय, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने (बीएफआय) सोमवारी राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी वर्ल्ड चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेता अमित पंघाल आणि माजी जागतिक कांस्यपदक विजेता विकास कृष्ण यांच्या नावांची शिफारस केली. अमितने काही महिन्यांपूर्वी पुढील वर्षापर्यंत ढकलण्यात आलेल्या ऑलिंपिकमध्ये भारताकडून कोटा मिळवला आहे.