BCCI आणि सरकारने क्रिकेटप्रेमींसाठी केली मोठी घोषणा, लॉकडाउनमध्ये डीडी स्पोर्ट्सवर पाहायला मिळणार 'हे' रोमांचक सामने, जाणून घ्या पूर्ण शेड्युल
यामुळे क्रिकेट लॉकडाउनच्या काळात मनोरंजन केले जाईल. याचा अर्थ सौरव गांगुलीच्या नेतृत्वातील टीम इंडिया पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांसमोर असेल. बीसीसीआय ट्विटरने याबाबत माहिती दिली.
संपूर्ण देश लॉकडाउनच्या (Lockdown) नियमांचे अनुसरण करीत कोरोना व्हायरसविरूद्ध (Coronavirus) सुरू असलेल्या लढाईला पाठिंबा देत आहे. अशा कठीण काळात लोकांच्या मनोरंजनाचीही काळजी घेतली जात आहे. रामायण आणि महाभारत सारख्या शोज नंतर आता क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बीसीसीआय (BCCI) आणि भारत सरकारने 2000 नंतरच्या क्रिकेट सामन्यांची ठळक वैशिष्ट्ये डीडी स्पोर्ट्सवर (DD Sports) दाखवले जाण्यासह जाहीर केले आहे. यामुळे क्रिकेट लॉकडाउनच्या काळात मनोरंजन केले जाईल. याचा अर्थ सौरव गांगुलीच्या नेतृत्वातील टीम इंडिया (Indian Team) पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांसमोर असेल. बीसीसीआय ट्विटरने याबाबत माहिती दिली. त्यांनी लिहिले, "बीसीसीआय आणि भारत सरकारने मागील काही वर्षाचे सामने पुन्हा एकदा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून घरी रहा आणि डीडी स्पोर्ट्स चॅनेलवरील रोमांचचा आनंद लुटा."
2003 मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड तिरंगी मालिका, दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा 2000, 2001 मधील ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, 2002 मध्ये वेस्ट इंडिजचा भरात दौरा, आणि 2005 मधील श्रीलंका दौर्यावरील काही रोमांचक सामन्यांचे हायलाईट्स डीडी स्पोर्ट्सवर चाहत्यांना पाहायला मिळेल. यापूर्वी स्टार स्पोर्ट्सने लॉकडाऊन दरम्यान भारत आणि पाकिस्तान वर्ल्ड कप सामने दाखविण्याची घोषणा केली होती. स्टार स्पोर्ट्सनुसार वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 4 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान सामने दाखवले जात आहेत. याची सुरुवात 1992 विश्वचषक सामन्यापासून झाली.
कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे सर्व मालिका एका-मागून एक रद्द करण्यात आल्या असून आज अशी परिस्थिती आहे की जगात कुठेही क्रिकेट सामना खेळला जात नाही. 29 मार्चपासून क्रिकेट प्रेमी आयपीएलच्या थरारची तयारी करत होते, पण हे सामने होऊ शकले नाहीत. अशा स्थितीत क्रिकेट क्रीडाप्रेमींच्या हृदयात क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी आणि जुन्या सामन्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी हायलाईट्स दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डीडी स्पोर्ट्सवर हे समाने 7 ते 14 एप्रिल दरम्यान असे एकूण 20 सामन्यांचे हायलाइट प्रसारित केले जातील.