बांगलादेशमध्ये होणार आशिया XI आणि वर्ल्ड XI मध्ये टी-20 घमासान, विश्वक्रिकेटमधील चर्चित खेळाडू होऊ शकतात सहभागी

बांग्लादेश क्रिकेट बोर्डने जाहीर केले आहे की त्यांचे संस्थापक वडील शेख मुजीबूर रहमान यांच्या जन्माच्या शताब्दीच्या वेळी आशिया XI आणि वर्ल्ड इलेव्हन संघात दोन टी-20 सामने आयोजित करण्यात येणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

बांग्लादेश (Bangladesh) क्रिकेट बोर्ड (BCB) ने जाहीर केले आहे की त्यांचे संस्थापक वडील शेख मुजीबूर रहमान यांच्या जन्माच्या शताब्दीच्या वेळी आशिया XI (Asia XI) आणि वर्ल्ड इलेव्हन (World XI) यासंघात दोन टी-20 सामने आयोजित करण्यात येणार आहे. शेख मुजीब रहमान (Sheikh Mujibur Rahman) हे बांग्लादेशचे पहिले राष्ट्रपती आणि दुसरे प्रधानमंत्री होते. ऑगस्ट 1975 मध्ये शेख यांची हत्या करण्यात आली होती. बीसीबीचे अध्यक्ष नझमुल हसन (Nazmul Hassan) यांनी या दोन टी-20 सामन्यासाठी दोन्ही संघात सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश करण्याचे वचन दिले आहे. आणि असे झाल्यास क्रिकेट विश्वासाठी हा एक ऐतिहासिक क्षण असेल. शिवाय त्यांनी हे देखील सांगितले की गेल्या आठवड्यात आयसीसी (ICC) च्या बैठकीत दोन्ही सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे. ('Captain Cool' एम एस धोनी स्टाईल विकेट घेतल्यावर हॅम्पशायर मधील क्रिकेट चाहते खूश; विकेटकीपरने दाखवला उत्कृष्ट खेळीचा नमूना, पहा (Video))

हा सामना 18-21 मार्च 2020 मध्ये मिरपूरच्या शेर-ए-बांगला (Sher-e Bangla) राष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार आशिया इलेव्हनमध्ये-भारत (India), पाकिस्तान (Pakistan), अफगाणिस्तान (Afghanistan), बांगलादेश (Bangladesh), आणि श्रीलंका (Sri Lanka) संघातील खेळाडू एकत्र खेळतील. दुसरीकडे, वर्ल्ड इलेव्हनमध्ये वेस्ट इंडीज (West Indies), इंग्लंड (England), ऑस्ट्रेलिया (Australia), न्यूझीलंड (New Zealand) आणि दक्षिण अफ्रिकाचे (South Africa) खेळाडू सहभागी होतील. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या अहवालानुसार, हसन म्हणाले, "जर खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामने असतील तर या सामन्यात खेळणे ही एक समस्या असेल. मला वाटते की त्या वेळी फक्त संघच खेळतील परंतु ते टी-20 खेळणार नाहीत. अशा वेळी त्या देखाच्या टी-20 खेळाडूंचा समावेश होऊ शकतो."

जगभरातील विविध क्रिकेट मंडळांनी विशेष प्रसंग साजरा करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहेत. अशा परिस्थितीत, बांग्लादेशलाही हा प्रसंग त्यांच्यासाठी खास बनवायचा होता आणि म्हणूनच या दोन सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे. 1993 मध्ये बंगाल क्रिकेट असोसिएशनने आपल्या 60 व्या जयंतीच्या निमित्त पाच देशांचा समावेश करत बहु-प्रख्यात हीरो कपचे आयोजित केले होते. तर 2017 मध्ये पाकिस्तानने आपल्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परत आणण्यासाठी लाहोरमध्ये वर्ल्ड इलेव्हन विरुद्ध तीन टी-20 सामने खेळवले होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now